जालना जिल्हा शैक्षणिक सल्लागार म्हणून महेंद्र बेराड यांची नियुक्ती
By गौतम वाघ

जालना जिल्हा शैक्षणिक सल्लागार म्हणून महेंद्र बेराड यांची नियुक्ती
जालना (प्रतिनिधी) – फलटण एज्युकेशन सोसायटीने महेंद्र संपत बेराड यांची जालना जिल्ह्याचे शैक्षणिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. या महत्त्वपूर्ण नियुक्तीबद्दल त्यांचा नुकताच एका विशेष कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत मालोजीराजे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रवेश केंद्र आणि द गुरु द्रोणा सायन्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या केंद्राच्या माध्यमातून NDA, NEET, JEE, NATA आणि ११वी-१२वी सायन्स फाऊंडेशन अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन दिले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी येथे अद्ययावत लायब्ररी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध आहे. यासोबतच, ऑनलाइन आणि ऑफलाइन टेस्ट सिरीजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या तयारीची योग्य पडताळणी करण्याची संधी मिळते. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
या सत्कार समारंभाला प्रा. अविनाश नरुटे (संचालक), प्रा. गणेश कोकरे (शाखा व्यवस्थापक), बोधीट्री आयएएस एनडीए अकॅडमीचे (कोल्हापूर) संचालक प्रा. जमीर मुल्ला, सौ. अपर्णा शिंदे (प्रशासन प्रमुख), डॉ. महेश पतंगे (अकॅडमिक हेड कम प्रिन्सिपल), सागर सूर्यवंशी (शैक्षणिक सल्लागार प्रमुख), अभिजीत बनसोडे (डिजिटल मार्केटिंग), निरंजन गुरव (परीक्षा प्रमुख) आणि इतर सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी महेंद्र बेराड सरांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम यश मिळेल आणि जिल्ह्याचे व राज्याचे नाव उज्वल होईल, असा विश्वास व्यक्त केला.