पारध बुद्रुक येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
By तेजराव दांडगे

पारध बुद्रुक येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
पारध (प्रतिनिधी): भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथे महात्मा जोतीबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ग्रामस्थांनी एकत्र येत महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याचा आणि विचारांचा जागर केला. शिक्षण आणि समाजातील दुर्बळ घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण करण्यात आले. शेतकरी आणि बहुजन समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा यावेळी गौरव करण्यात आला.
गावातील तरुण पिढीने मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि महात्मा फुले यांच्या विचारांना आत्मसात करण्याचा निर्धार व्यक्त केला. ११ एप्रिल हा दिवस भारतीय इतिहासात विशेष महत्त्वाचा आहे, कारण याच दिवशी महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली जाते. ते केवळ एक सामाजिक कार्यकर्ते नव्हते, तर एक द्रष्टे शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक म्हणूनही त्यांनी समाजात महत्त्वपूर्ण बदल घडवले, असे विचार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
समाजात जात, धर्म आणि लिंग भेदभावाशिवाय एकात्मता नांदावी यासाठी महात्मा फुले यांनी आयुष्यभर संघर्ष केला. आजही त्यांचे विचार आणि कार्य समाजाला नवी दिशा दाखवणारे आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. महात्मा फुले यांनी समाजातील रूढीवादी विचार आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. त्यांच्या कार्यामुळे समाजात शिक्षणाचे महत्त्व वाढले आणि स्त्रिया व दुर्बळ घटकांना समान संधी मिळाली.
यावेळी सुरेश अल्हाट, ज्ञानेश्वर अल्हाट, सुनील डोईफोडे, दामोधर अल्हाट, वैभव भोरकडे, संदीप अल्हाट, अक्षय अल्हाट, संजय तवडे, विजय तवडे, योगेश लोखंडे, विकास लोखंडे, राजू भोरकडे, किशोर भोरकडे, स्वप्नील अल्हाट, अभिनय अल्हाट, पल्लवी ज्ञानेश्वर अल्हाट, सीमा स्वप्नील अल्हाट यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.