क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव उत्साहात साजरा, माळीपुरा लवकरच सावित्रीबाई फुलेनगर या नावाने ओळखला जाईल-आ.खोतकर
By तेजराव दांडगे
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव उत्साहात साजरा, माळीपुरा लवकरच सावित्रीबाई फुलेनगर या नावाने ओळखला जाईल-आ.खोतकर
जालना : माळीपुर्याचे नामांतर सावित्रीबाई फुले नगर करण्याचा ठराव लवकरात लवकर घेतला जाईल आणि राहिला प्रश्न कमानीचा तर त्यासाठी निधीची वाट पाहावी लागणार नाही. त्याचबरोबर सावित्रीबाई फुलेंचा पुतळाही उभा करण्यात येईल, अशी ग्वाही आ. अर्जुनराव खोतकर यांनी येथे बोलतांना दिली.
आज शुक्रवारी गांधी चमन परिसरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी कार्यक्रमाचे आयोजक बाबासाहेब वानखेडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना वरील मागण्या केल्या. त्या आमदार खोतकर यांनी लागलीच मान्य केल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, बाबुराव मामा जाधव, बाबु पवार, विष्णू पाचफुले, मुन्ना भोसले, राजेंद्र जाधव, विजय पवार, प्रा. राजकुमार बुलबुले, माजी सरपंच सुभाषराव पवार, गंगुबाई वानखेडे, डॉ. विशाल धानुरे, दिपक वैद्य, सुरेशराव रत्नपारखे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभीच मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पुढे बोलतांना खोतकर म्हणाले की, राज्याने जी काही क्रांती केली तीच मुळात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची देण आहे. त्यांच्यामुळेच हे राज्य आणि देश आजही प्रगती पथावर आहे. सावित्रीबाईंनी अत्यंत पवित्र असं शिक्षणाचे कार्य केले. आज ज्या काही मागण्या आपल्याकडे करण्यात आल्या. त्याबाबत कोणत्याही प्रकारे निधीची अडचण येणार नाही. तुम्ही चांगला आराखडा तयार करा, आपण त्यास निश्चितच परवानगी देऊत, आणि सुशोभिकरणाचेही कामही करुत, अशी ग्वाही आ. खोतकर यांनी दिली.
याप्रसंगी भास्करराव अंबेकर यांचेही समयोचित भाषण झाले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले. तर यावेळी उपस्थितांना लड्ूचेही वाटप करण्यात आले. कार्यक्रमास परिसरातील नागरीक, महिला व युवा वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती.