
वर्षावास निमित्ताने खीरदान
आज दिनांक14/10/2025.धावडा येथे विजया दशमी धम्म दीक्षा दिवस साजरा करण्यात आला. धावडा या नगरीतील सर्व उपासक आणि उपासिका व गावातील सर्व नागरिकांनी सहभाग नोंदविला. .”बुद्ध आणि धम्म ” या विषयावर कुमारी प्रतीक्षा साबळे हिने बुद्ध धर्मा बदल चांगले प्रवचन देऊन मोलाचे मार्ग दर्शन घडविले.या नंतर भीम गीताचा कार्यक्रम म्हसळा बुद्रुक येथील गायन पार्टी ने बुद्ध व भीम गीतांचा कार्य क्रम सादर केला. गायनातून धम्माचे प्रबोधन करण्यात आले. उषाबाई जाधव यांनीसुध्दा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीतातून सर्वांना मंत्र मग्न केले…या कार्यकर्माचे सुत्रसंचालन कॅप्टन गौतम साबळे यांनी केले. सौ सरला राहुल इंगळे व धम्म भगिनी यांच्या वर्षावास समाप्ती चा योग होता. वर्षावास समाप्ती निमित्ताने सर्व उपासक उपासिका यांनी खीर दान केले.आभार प्रदर्शन समाधान इंगळे यांनी केले.