राजर्षी शाहू विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी
By तेजराव दांडगे
राजर्षी शाहू विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी
राजर्षी शाहू विद्यालय पारध मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास लोखंडे तर प्रमुख पाहुणे प्राचार्य राजाराम डोईफोडे व उपप्राचार्य अमोल बांडगे होते. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच काही विद्यार्थीनी क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांच्या वेशभूषेमध्ये आले. विद्यालयाचे सहशिक्षक विवेक पऱ्हाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप मध्ये मुख्याध्यापक विलास लोखंडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 9 वी ची विद्यार्थिनी कु.मानसी भारती हिने केले, प्रास्ताविक ज्ञानेश्वर अल्हाट व आभार प्रदर्शन विवेक अवसरमोल यांनी केले. या प्रसंगी स्वप्नील वाघ,भागवत पानपाटील,गजानन लोखंडे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते