मराठवाडा भूषण पुरस्काराने पत्रकारांचा सन्मान; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे रौप्य महोत्सवी अधिवेशन उत्साहात संपन्न
परिसंवादातून वक्त्यांनी मांडली परखड मते; राज्यभरातील पत्रकार मान्यवरांची उपस्थिती

मराठवाडा भूषण पुरस्काराने पत्रकारांचा सन्मान; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे रौप्य महोत्सवी अधिवेशन उत्साहात संपन्न
By गोकुळ सपकाळ
जालना, दि. 15 : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित रौप्य महोत्सवी अधिवेशन रविवार, १५ जून रोजी संत एकनाथ रंग मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनाचे उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झाले, तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते राज्यभरातील कर्तृत्ववान व्यक्तींना “मराठवाडा भूषण पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. “माध्यमांचा डीएनए कोणता?” या परिसंवादातून विविध पत्रकार वक्त्यांनी आपली परखड मते मांडून पत्रकारितेची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज, महाराष्ट्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे, डिजिटल मीडियाचे अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, मराठवाडा अध्यक्ष अनिल सावंत, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष डॉ. छबुराव ताके, जालना जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष जयदीप कवाडे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय केणेकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर अण्णा वैद्य, महापौर नंदकुमार घोडेले, माजी अध्यक्ष वसंत मुंढे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक, पत्रकार अश्विनी डोके, अविनाश वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मंत्री अतुल सावे म्हणाले की, राजकारणात असताना त्यांना रोजच पत्रकारांशी संवाद साधावा लागतो. प्रत्येक शब्द जबाबदारीने बोलणे हे त्यांचे प्राधान्य असते. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेची ओळख आहे. त्यांनी आपल्या वडिलांनी रोज वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावली, तीच सवय आज त्यांच्या मुलांसोबत सकाळी वर्तमानपत्र वाचून ते जपतात. पत्रकारांनी केलेले वार्तांकन त्यांच्या ज्ञानात नेहमीच भर घालणारे असल्याने भारतीय माध्यम क्षेत्र अधिक सक्षम झाले पाहिजे, अशी अपेक्षा मंत्री सावे यांनी यावेळी व्यक्त केली.
मराठवाडा भूषण पुरस्कार वितरणप्रसंगी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, गेली चाळीस वर्षे ते राजकारणात आहेत आणि आज मंत्रीपदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी जेवढी मेहनत घेतली, तेवढीच मेहनत त्यांच्या आयुष्यात पत्रकारांचीही आहे. काही माध्यमं चुकीची बातमी देऊन मिळवलेले यश दुर्लक्षित करतात. मात्र, चाळीस वर्षे राजकारण करताना प्रचंड कष्ट करावे लागले, मंत्रीपद सहज मिळाले नाही, त्यामुळे पत्रकारांनी बातमी देताना आमच्यातील चांगल्या गोष्टींचाही विचार करावा, असे सांगत मंत्री शिरसाट यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनास शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, आमदार संजय केणेकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल सावंत यांनी केले, तर सूत्रसंचालन संजय शिंदे व वैभव स्वामी यांनी केले. समारोप डॉ. विश्वास आरोटे यांनी केला. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणीचे राज्य समन्वयक नितीन शिंदे, प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव, प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाखडा, प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे, निवड समिती प्रमुख रुपेश पाडमुख तसेच सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी शहराध्यक्ष देविदास कोळेकर, जिल्हा उपाध्यक्ष जे.इ. भांबर्डे, मराठवाडा सल्लागार विलास इंगळे, सहसचिव मनोज पाटणी, सचिव महेंद्र डेंगळे, प्रसिद्धी प्रमुख सचिन लीला सुखदेव अंभोरे, संपर्क प्रमुख सुजित ताजने, सहसचिव रवींद्र लांडगे, ज्ञानेश्वर तांबे, संताराम मगर, आनंद अंभोरे, माधव खिल्लारे यांनी पुढाकार घेतला. तसेच गोपालजी पटेल, लक्ष्मीनारायणजी राठी, राजू परदेशी आदींचे सहकार्य लाभले.
मराठवाडा भूषण पुरस्काराचे मानकरी…
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगरच्या वतीने रौप्य महोत्सवी अधिवेशनात मराठवाडा भूषण पुरस्काराने खालील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले:
मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत, छत्रपती संभाजीनगर भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे येथील मुख्य अभियंता अतुल चव्हाण, चंद्रसेन कोठावळे, जयंती कठाळे, अभिनेता योगेश शिरसाट, प्रशांत गिरी, अशोक देशमाने, शेख मुजीब, अरुण पवार, हनुमंत भोंडवे, मधुकर अण्णा वैद्य, जयप्रकाश दगडे, सचिन चपळगावकर, शिवराज बिचेवार, अशा शेरखाने, कटके, गणेश गायकवाड, प्रशांत गिरे, सुनील देवरा, बी. एस. स्वामी, मधुकर सावंत, राजेंद्रसिंह सूर्यवंशी.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट संघटक पुरस्कार…
या अधिवेशनात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या खालील पदाधिकाऱ्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट संघटक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले:
दशरथ चव्हाण – नवी मुंबई, दत्ता घाडगे- अहिल्यानगर, भगवान चंदे – ठाणे, राजेंद्र कोरडे पाटील – सोलापूर, स्वामीराज गायकवाड, नयन मोंढे – अमरावती, राकेश खराडे – रायगड, किशोर रायसाकडा- जळगाव, जितेंद्र सिंह राजपूत – उत्तर महाराष्ट्र, नितीन शिंदे – पश्चिम महाराष्ट्र, चंद्रकांत पाटील- कोल्हापूर, संतोष पडवळ- ठाणे शहर, संजय फुलसुंदर, राहुल फुंद- शिर्डी, गणेश सुरजसे- अकोला, अनुप कुमार भार्गव- वर्धा, लक्ष्मण डोळस – नाशिक, निलेश सोमानी- वाशिम विदर्भ, दत्तात्रय राऊत – जामखेड.
हे अधिवेशन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरले असून, यानिमित्ताने पत्रकारितेच्या क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात आला.