पत्रकार विशाल अस्वार यांना ‘आदर्श पत्रकारिता’ पुरस्कार; बुलढाण्यात गौरव
By तेजराव दांडगे

पत्रकार विशाल अस्वार यांना ‘आदर्श पत्रकारिता’ पुरस्कार; बुलढाण्यात गौरव
पारध, दि. २८ जून: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील पत्रकार आणि केंद्रीय पत्रकार संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष विशाल अस्वार यांना आज बुलढाणा येथे ‘पहाट फाउंडेशन’तर्फे आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण संवर्धन परिषद व पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यस्तरीय उत्कृष्ट व आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ग्रामीण भागात उत्कृष्ट पत्रकारिता केल्याबद्दल विशाल अस्वार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय सभागृहात आयोजित या सोहळ्यात पर्यावरण संवर्धनाच्या महत्त्वाच्या विषयावर मंथन करण्यात आले.
या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील, ‘मिसेस इंडिया’ विजेत्या श्वेता परदेशी, मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात, सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, रणजीत सिंग राजपूत, उपवनसंरक्षक सरोज गवस, उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्राचार्य हरीश साखरे, अविनाश गेडाम, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री केतकी गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळ्याचे आयोजन पहाट फाउंडेशनचे अर्पिता सुरडकर, अमोल भिलंगे, सोमनाथ चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. विशाल अस्वार यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.