जालन्याच्या ‘सेवा स्किन केअर’ला आयुष महासन्मान पुरस्काराने गौरव
By गौतम वाघ ( डॉ संदिप राठोड यांना आयुष महासन्मान पुरस्कार )

जालन्याच्या ‘सेवा स्किन केअर’ला आयुष महासन्मान पुरस्काराने गौरव
मुंबई, दि. १६ : जालन्यातील सेवा स्किन केअरचे संचालक, प्रसिद्ध डॉक्टर संदीप राठोड यांना १४ सप्टेंबर रोजी मुंबई येथे एका दिमाखदार सोहळ्यात ‘आयुष महासन्मान २०२५’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. संदीप राठोड यांना, ‘आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन’तर्फे १४ सप्टेंबर (रविवार) रोजी ‘आयुष महासन्मान पुरस्कार २०२५’ देऊन मुंबईतील एका तारांकित हॉटेलमध्ये सन्मानित करण्यात आले.
या भव्य सोहळ्याला भारतातील शेकडो आयुष डॉक्टर आणि थेरपिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिनेस्टार श्रेया बुगडे, चिखलीच्या लोकप्रिय आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी व्यासपीठावर डॉ. मंगला कोहली (सल्लागार, युनायटेड नेशन चाईल्ड अँड वुमेन), डॉ. एम. गणेश (असिस्टंट डायरेक्टर अँड हेड, ईसी – राजकोट अँड उदयपूर, एमएसएमई), डॉ. प्रणव पांड्या, आणि डॉ. प्रवीण जोशी यांसारखे अनेक दिग्गज उपस्थित होते.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे व्हाईस चेअरमन डॉ. नितीन राजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, तसेच डॉ. दिशा चव्हाण, प्रशांत सावंत, डॉ. रवी शिंदे, डॉ. रचित म्हात्रे, डॉ. जनार्धन यादव, डॉ. विनोद ढोबळे, डॉ. राकेश झोपे, डॉ. भूषण नागरे, डॉ. विजय नवल पाटील, डॉ. फुके, डॉ. रामेश्वर शिंदे, डॉ. मेश्राम, प्रवक्ते तुषार वाघूळदे यांच्यासह इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.
हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरांतून डॉ. संदीप राठोड यांचे कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.