जालना: ‘योग पर्व २०२५’ ने भोकरदनमध्ये योगमय वातावरणाची निर्मिती; श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रेरणेने भव्य आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा!
By गौतम वाघ

जालना: ‘योग पर्व २०२५’ ने भोकरदनमध्ये योगमय वातावरणाची निर्मिती; श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रेरणेने भव्य आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा!
भोकरदन: अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम, ता.जि. रत्नागिरी यांच्या महान प्रेरणेने आणि अखिल भारतीय युवा सेनेच्या अंतर्गत, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘योग पर्व २०२५ – SHAPE A BEAUTIFUL LIFE THROUGH YOGA’ हा भव्य उपक्रम आज (२१ जून २०२५) स्व स्वरूप संप्रदाय, जालना जिल्हा सेवा समितीने तालुका युवा सेनेमार्फत यशस्वीपणे आयोजित केला.
भोकरदन तालुक्यातील रेणुकादेवी विद्यालय, पिंपळगाव रेणुकाई येथे सकाळी ८.०० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या योग शिबिरात मोठ्या संख्येने भक्तगण आणि पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी जालना जिल्हा सेवा अध्यक्ष नवनाथ पवार, जिल्हा लेफ्टनंट कर्नल सुदाम पोटे, जिल्हा ब्लॅक कमांडो विठ्ठल तांगडे, वसंता माघाडे, गंजीधर तांगडे, जिल्हा तंत्रज्ञान प्रमुख कैलास गुंड, जालना जिल्हा जनगणना प्रमुख कृष्णा पवार, भोकरदन तालुका सेवा अध्यक्ष प्रकाश जाधव, भोकरदन तालुका उत्तर विभाग महिला अध्यक्ष सौ. प्रतिभाताई सोनवणे, भोकरदन तालुका युवा अध्यक्ष रामदास दौड, भोकरदन तालुका संजीवनी प्रमुख कृष्णा चंडोल, तालुका आध्यात्मिक प्रमुख गजानन शेजुळ, तालुका बिन प्रमुख विष्णू कड, तालुका सचिव भाऊसाहेब सपकाळ, तालुका देणगी प्रमुख अनंता शेळके, तालुका तंत्रज्ञान प्रमुख कुंडलीक भांबीरे, तालुका सामाजिक उपक्रम प्रमुख संतोष जाधव, तालुका प्रसिद्धी प्रमुख अमोल शिरसाट, तालुका लेफ्टनंट कॅप्टन सारंगधर जगताप आणि तालुका लेफ्टनंट कॅप्टन महिला सौ. कविताताई राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी योगाचे महत्त्व आणि निरोगी जीवनातील त्याची भूमिका यावर मार्गदर्शन केले. संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहितीही देण्यात आली. स्व स्वरूप संप्रदाय हे केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामस्वच्छता अभियान, शैक्षणिक व वैद्यकीय उपक्रम, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण, आपत्कालीन मदत आणि कायदेविषयक साक्षरता शिबिरे यांसारख्या अनेक समाजोपयोगी कार्यांमध्ये संस्था नेहमीच अग्रेसर असते.
संस्थेच्या काही उल्लेखनीय सामाजिक कार्याची झलक:
* ब्लड इन नीड उपक्रम: या उपक्रमांतर्गत गरजू रुग्णांना आतापर्यंत २५,००० हून अधिक रक्त युनिट्स प्रदान करून त्यांचे प्राण वाचविण्यात आले आहेत.
भव्य रक्तदान शिबिर: ४ जानेवारी २०२५ ते १९ जानेवारी २०२५ या १५ दिवसांच्या कालावधीत संस्थेने महाराष्ट्रभर आणि राज्याबाहेरही रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. यात १,३६,२४७ रक्त कुपिका संकलित करून महाराष्ट्र शासनाच्या रक्त संकलन परिषदेला सुपूर्द करण्यात आल्या आहेत.
मरणोत्तर देहदान: सप्टेंबर २०१६ पासून आजपर्यंत ११४ मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना समाजाच्या सेवेसाठी सुपूर्द करण्यात आले आहे.
महामार्गावरील रुग्णवाहिका सेवा: राज्यातील १० राष्ट्रीय महामार्गांवर ५३ रुग्णवाहिका विनामूल्य सेवा देत असून, आतापर्यंत २८,१९२ हून अधिक अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
अवयवदान: संस्थेच्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत ३१ जणांनी अवयवदान करून इतरांना जीवनदान दिले आहे.
याच समाजोपयोगी कार्याचा एक भाग म्हणून आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘योग पर्व २०२५’ या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, जे युवकांमध्ये योग आणि निरोगी जीवनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. या उपक्रमाला भोकरदन तालुक्यातील भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला.