Jalna: मोबाईल टॅब, मोबाईल, एटीएम कार्ड असलेली बॅग चोरणाऱ्या चोराला स्थानिक गुन्हे शाखेने 2 तासांत पकडले
By तेजराव दांडगे

Jalna: मोबाईल टॅब, मोबाईल, एटीएम कार्ड असलेली बॅग चोरणाऱ्या चोराला स्थानिक गुन्हे शाखेने 2 तासांत पकडले
जालना, दि. 23: जिल्ह्यातील चोरीच्या घटनांचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चोरीच्या घटनांचा तपास करण्याचे निर्देश दिले.
23 मार्च 2025 रोजी जालना शहरातील कदीम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोमेश्वर महादेव मंदिराच्या परिसरातून टॅब, मोबाईल आणि एटीएम कार्ड असलेली बॅग चोरीला गेल्याची तक्रार आरती रावसाहेब शिंदे यांनी दिली होती. त्यांनी कदीम पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीताविरुद्ध कलम 303 (2) भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चोरीच्या घटनेचा तपास करण्याचे निर्देश दिले.
तपासादरम्यान, शनिमंदिर जालना येथील दीपक दत्ता नाईकवडे याने चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पथकाने आरोपीताला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला. त्याच्याकडून 25 हजार रुपये किमतीचा टॅब, मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, रमेश राठोड, गोपाल गोशिक, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, रमेश काळे आणि संदीप चिंचोले यांनी ही कारवाई केली.