Jalna: तलाठ्यासाठी लाच स्वीकारताना दलाल ए.सी.बी. च्या जाळ्यात, तलाठी मात्र फरार
By तेजराव दांडगे
Jalna: तलाठ्याने जमिनीच्या फेरफारसाठी मागितली अडीच हजार रुपयाची लाच! लाच स्विकारतांना दलाल अटकेत; तलाठी मात्र फरार
भोकरदन, पारध दि. 24: तालुक्यातील पारध येथील सजाचे ग्राम महासुल अधिकारी (तलाठी) यांच्यासह खाजगी कर्मचाऱ्यास लाज घेताना पकडण्यात आले आहे. पारध येथे तलाठी कार्यालयात जालना लाच प्रतिबंधक विभागाची कारवाई केली. यात खाजगी कर्मचारी कृष्णा गणेश दळवी (वय ३६ रा. येवता ता. जाफराबाद जि. जालना) यांना अटक करण्यात आली. तर अभय मधुकरराव कुलकर्णी (वय ४८ वर्षे पद ग्राम महासुल अधिकारी नेमणूक पारध ता. भोकरदन जि. जालना) हे फरार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या खाजगी कर्मचाऱ्यांची झडती घेतली असता २५०० रुपयासह रोख रक्कम २८ हजार २९० रुपये आढळून आले आहे. भोकरदन तालुक्यातील पारध येथील तक्रारदारांने आपल्या आईने खरेदी केलेल्या जमिनीचा फेर घेण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी कोणत्याही प्रकारची सरकारी फीस नसताना ३ हजार हजार लाच मागणी केली. तक्रारदार लाज देण्याची इच्छा नसल्याने सोमवारी (दि. २४) जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकास पारध येथे लिखित तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने आज पारध येथे तलाठी कार्यालयात पडताळणी केली असता खाजगी गणेश दळवी यांनी ३ हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदारांनी काही कमी करा म्हणून विनंती केली असता खाजगी कर्मचारी कृष्णा दळवी यांनी तक्रारदारांस ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) अभय कुलकर्णी याचे कडे पाठवले असता, त्यांनी तक्रारदाराकडे पंचांसमक्ष ३ हजार रुपयांची स्वतः करिता लाचेची मागणी करुन तडजोडी अंती २ हजार ५०० स्वीकारण्याचे मान्य केले. दरम्यान यातील ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) अभय कुलकर्णी यांनी सोमवारी (दि. २४) तक्रारदार यांचेकडून २ हजार ५०० रुपये स्वतःचे कार्यालयात खाजगी गणेश दळवी याचे हस्ते स्वीकारले असता दळवी याला लाचेचे रकमेसह रंगेहात पकडण्यात आले आहे. खाजगी कर्मचारी गणेश दळवी याची अंग झडतीत घेतली असता त्याकडे लाच रक्कम २ हजार ५०० रुपये पंचासमक्ष जप्त करण्यात आले. तसेच खासगी कर्मचारी दळवी याची अंग झडती घेतली असता अंगझडतीत लाचेचे रकमे व्यतिरिक्त रोख २८ हजार २९० मिळुन आले असे एकूण रोख ३० हजार ७९० ताब्यात घेण्यात आले आहे. सदर रकमेबाबत खाजगी कर्मचारी दळवी यांच्याकडुन कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण दिले नसल्याने सदरची रक्कम पुढील तपासकामी जप्त करण्यात आली आहे. या दोघांच्या घरांची घरझडती सुरू आहे. दरम्यान खाजगी कर्मचारी गणेश दळवी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांना अटक करण्यात आले आहे. तर ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) अभय कुलकर्णी यांचा शोध घेणे सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. हि कारवाई पोलिस उपअधीक्षक बी.एम. जाधवर, पोलिस अंमलदार भालचंद्र बिनोरकर, गणेश चेके, अशोक राऊत यांनी केले आहे. दरम्यान गणेश दळवी यांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून पुढील निरीक्षण करून तपास करण्याची तजवीज ठेवली आहे.