Jalna: पारध बु येथील स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूल येथे आनंदनगरी उत्साहात साजरी
कार्यक्रमाचे उद्घाटन पारध पोलिस स्टेशन चे साह्ययक पोलिस निरिक्षक संतोष माने यांच्या हस्ते झाले
Jalna: पारध बु येथील स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूल येथे आनंदनगरी उत्साहात साजरी
पारध, दि. 24: भोकरदन तालुक्यातील पारध बु येथील स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कुल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्याच्या कलागुणांचा विकास व्हावा व त्यांच्या व्यवहारिक ज्ञानात भर पडावी, या उद्देशाने आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन पारध पोलिस स्टेशन चे साह्ययक पोलिस निरिक्षक संतोष माने यांच्या हस्ते झाले, या प्रसंगी उपसरपंच शेखर श्रीवास्तव, विक्रांत श्रीवास्तव, गावातील ग्रामस्थ पालकवर्ग उपस्थित होते.
आनंदनगरीच्या कार्यक्रमात मुलांनी उत्साहानी सहभाग घेतला. शाळेचे मुख्यद्वार रांगोळी ने तसेच विविध रंगाची फुले व फुलदाण्यानी सजविले होते. मुलांनी स्वत: बनविलेले खाद्यपदार्थ जसे इडली, भेळ, पाणिपुरी, कचोरी, समोसे, वडापाव, फळे, रगडा पॅटिस, चहा अशा अनेक खाद्यपदार्थाचे स्टाॅल मुलांनी लावले होते.
शाळेच्या शिक्षिकांनी मुलांना वस्तुंची विक्री करण्याचे व जमा खर्चाचा हिशोब ठेवण्याचे मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्यध्यापक सचिन लक्कस व प्राचार्य कदम सर यांनी कार्यक्रम उत्साहात यशस्वीपणे संपन्न झाल्या बद्दल समाधान व्यक्त केले.