Jalna: सदर बाजार डिबी पथकाची धडक कारवाई, गुटख्याच्या वाहनासह 9,50,000/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त
By तेजराव दांडगे

Jalna: सदर बाजार डिबी पथकाची धडक कारवाई, गुटख्याच्या वाहनासह 9,50,000/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त
जालना, दि. 28: पोलीस ठाणे सदर बाजार डिबी पथकाने जालना जिल्ह्यातील संभाजीनगर परिसरातून प्रतिबंधित गुटखा आणि वाहन असा एकूण 9,50,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
घटनाक्रम: 27/03/2025 रोजी, पोलीस ठाणे सदर बाजार डिबी पथकाचे प्रमुख पोउपनि शैलेश म्हस्के यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की संभाजीनगर परिसरात एक महिंद्रा जीतो प्लस लोडिंग गाडी उभी आहे, ज्यात प्रतिबंधित गुटखा आहे. त्यांनी ही माहिती प्रभारी अधिकारी संदीप भारती यांना दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी जाऊन MH-20-BH-7400 क्रमांकाची गाडी शोधून काढली.
गाडी मालक अजय वाघमारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा मोबाईल बंद होता. गाडी पोलीस ठाण्यात आणून अन्न व औषध प्रशासनाला माहिती देण्यात आली.
28/03/2025 रोजी अन्न व औषध प्रशासनाने गाडीची तपासणी केली, ज्यात 2,00,000/- रुपये किमतीचा गुटखा (1000 पाकिटे) आणि 7,50,000/- रुपये किमतीची गाडी सापडली असून अजय वाघमारे आणि सचिन तारगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल: कलम 123, 223, 275, 3 (5) भारतीय न्यास संहिता 2023
कलम 59 अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयूष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे आणि पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पोउपनि शैलेश म्हस्के आणि डी.बी. पथकातील पोहेकों रामप्रसाद रंगे, पोहेकॉ धनाजी कावळे आणि पोकॉ धनंजय लोढे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.