Jalna: गुंडेवाडी शिवारात जुगार अड्ड्यावर धाड, ११ आरोपी गजाआड, लाखोंचा मुद्देमाल जप्त!
By तेजराव दांडगे

Jalna: गुंडेवाडी शिवारात जुगार अड्ड्यावर धाड, ११ आरोपी गजाआड, लाखोंचा मुद्देमाल जप्त!
खाकीचा दणका: जालना पोलिसांची मोठी कारवाई!
जालना, २२ जून २०२५: जालना जिल्ह्यात जुगाराच्या अड्ड्यांवर कारवाईचा सपाटा सुरूच आहे. काल (२१ जून २०२५) रोजी स्थानिक गुन्हे शाखेने गुंडेवाडी शिवारातील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून ११ आरोपीतांना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ३४,०८,५२४/- रुपये किमतीची रोकड, जुगार साहित्य आणि वाहने जप्त केली आहेत.
जालना जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी जिल्ह्यातून जुगाराचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याच सूचनांनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना गुप्त खबऱ्यामार्फत गुंडेवाडी शिवारातील मधुकर निकाळजे यांच्या शेतात मोठा जुगार अड्डा सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सूत्रे हलवली. २१ जून २०२५ रोजी सायंकाळी ७:३० वाजता तांदुळवाडी खुर्द शिवार गट नं. २७ मधील मधुकर मोहनराव निकाळजे यांच्या शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकण्यात आला.
या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून नारायण भगवान काळे (वय ३८, रा. पोकळवडगाव), संतोष शंकर काळे (वय ३५, रा. संजयनगर देऊळगाव राजा), बाळू संपतराव वाघमारे (वय २७, रा. पीर पिंपळगाव), शेख ईस्माईल शेख इसा (वय ४०, रा. पीर पिंपळगाव), बबन माधवराव म्हस्के (वय ५५, रा. माळशेंद्रा), राजन छगन वाघमारे (वय ४८, रा. खडकपुरा देऊळगाव राजा), गोरख गुलाबा आढे (वय ४०, रा. मोहाडी तांडा), जावेदखान मोहंमद खान (वय ४५, रा. गारखेडा सुतगिरणी छत्रपती संभाजीनगर), प्रकाश आगाजी वाहुळे (वय ५८, रा. दरेगाव), संदीप नारायण चव्हाण (वय ४३, रा. आडगावराजा) आणि प्रदीपकुमार अर्जुनराव तांबिले (वय ५७, रा. डोणगाव) या ११ आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपीतांकडून रोकड, जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि घटनास्थळी असलेली वाहने असा एकूण ३४,०८,५२४/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीतांविरुद्ध सपोनि. योगेश उबाळे, स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्या तक्रारीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि. योगेश उबाळे, पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, भाऊराव गायके, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, रुस्तुम जैवाळ, कैलास खार्डे, प्रशांत लोखंडे, लक्ष्मीकांत आडेप, संभाजी तनपुरे, रमेश काळे, कैलास चेके, योगेश सहाने, धिरज भोसले, सोपान क्षीरसागर आणि अशोक जाधवर यांनी पार पाडली.
जालना पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर केलेल्या या धडक कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.