जालन्यात गोवंश हत्येचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपीतास त्याच्या साथीदारासह सदर बाजार पोलिसांनी केली अटक
जालना पोलिसांनी केली मोठी कारवाई: गोवंश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीतांसह साथीदार अटकेत

जालना पोलिसांनी केली मोठी कारवाई: गोवंश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीतांसह साथीदार अटकेत
जालना, (दिनांक ७ सप्टेंबर) – सोशल मीडियावर गोवंश हत्येचा व्हिडिओ व्हायरल झाल्याप्रकरणी जालना शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या घटनेतील मुख्य आरोपीत असलम कुरेशी, सोफियान शेख, आणि यासीन कुरेशी यांना अटक करण्यात आली आहे. हे आरोपीत घटनेनंतर फरार झाले होते.
नेमकं काय घडलं?
दिनांक ०१/०९/२०२५ रोजी एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तीन व्यक्ती गोवंश प्राण्यांची क्रूरपणे कत्तल करताना दिसत होत्या. या घटनेची दखल घेत सदर बाजार पोलीस ठाण्यात असलम महेमूद कुरेशी आणि इतर दोघांविरोधात भारतीय दंड विधान, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांची धडक मोहीम
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीत फरार झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अप्पर पोलीस अधीक्षक आयूष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चार विशेष पथके तयार केली. ही पथके हैदराबाद, खुलताबाद, मानवत, पाथरी आणि परभणी येथे आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाली.
तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपीत असलम कुरेशी आणि सोफियान शेख समद यांना ताब्यात घेतले. त्यानंतर, यासीन रशीद कुरेशी या तिसऱ्या आरोपीला घनसावंगी तालुक्यातील राजणी येथून अटक करण्यात आले. या तिन्ही आरोपींतांविरुद्ध संघटित गुन्हेगारी आणि आयटी कायद्यांतर्गत कलमे वाढवून पुढील तपास सुरू आहे.
ही उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक संदीप भारती, स्थागुशा पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात सपोनि उबाळे (स्थागुशा), डी.बी. पथकाचे प्रमुख पोउपनि शैलेश म्हस्के, पोउपनि सचिन सानप, पोउपनि संजय गवई, पोहेकॉ जगन्नाथ जाधव, पोहेकॉ धनाजी कावळे, पोहेकॉ सुभाष पवार, पोहेकॉ शिवहरी डिघोळे, पोहेकॉ बाबा हरणे, पोहेकॉ नजीर पटेल, स्थागुशा चे पोहेकॉ लक्ष्मीकांत आडेप, पोहेकॉ सतीश श्रीवास, प्रशांत लोखंडे, मपोहेकॉ शारदा गायकवाड, पोकों भगवान मुंजाळ, पोकों दुर्गेश गोफणे, पोकों अजिम शेख, पोकॉ गणेश तेजनकर, पोकों राहुल कटकम, पोकॉ धनंजय लोढे पोकॉ धीरज भोसले आणि चालक मोहन हिवाळे, कल्पेश पाटील, सददाम सय्यद यांचा सहभाग होता.
या यशस्वी कारवाईमुळे समाजात कायद्याचे राज्य अजूनही कायम असून, अशा प्रकारच्या अमानवीय कृत्यांना थारा दिला जाणार नाही, असा संदेश पोलिसांनी दिला आहे.