जालना: फसवणूक प्रकरणी एका आरोपीतास अटक, १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
By तेजराव दांडगे

जालना: फसवणूक प्रकरणी एका आरोपीतास अटक, १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
पारध, १६ जुलै २०२५: जालना जिल्ह्यातील पारध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात आता एक नवीन घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात नवनाथ सुदाम दौंड, रा. जानेफळ गायकवाड, याचा सहभाग निष्पन्न झाल्याने, त्यांना काल, १५ जुलै २०२५ रोजी जालना येथून अटक करण्यात आली आहे.
आज, १६ जुलै रोजी नवनाथ दौंड यांना माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने दौड यांना १८ जुलै २०२५ पर्यंत पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे. या अटकेमुळे प्रकरणाच्या पुढील तपासाला गती मिळाली असून, पोलीस अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी सांगितले आहे.
यापूर्वी, विजय उत्तमराव राठोड यांच्या तक्रारीनुसार, फसवणूक आणि इतर कलमांखाली १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. विर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्यादित, जानेफळ गायकवाड, येथील संगनमताने बनावट ७/१२ तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि एस.डी.माने हे करत आहेत.
जालन्यात सव्वा कोटींचा सोयाबीन घोटाळा; १० जणांवर गुन्हा दाखल, अटकेची प्रक्रिया सुरू!
जालन्यात सव्वा कोटींचा सोयाबीन घोटाळा; १० जणांवर गुन्हा दाखल, अटकेची प्रक्रिया सुरू!