Jalna: पारध पोलिसांची मोठी कारवाई! चोरीचे 18 मोबाईल जप्त; 32 वर्षीय आरोपीत गजाआड
By तेजराव दांडगे

Jalna: पारध पोलिसांची मोठी कारवाई! चोरीचे 18 मोबाईल जप्त; 32 वर्षीय आरोपीत गजाआड
पारध, दि. २८ : गुप्त माहितीच्या आधारे पारध पोलिसांनी (Paradh Police) मोठी कारवाई करत सुमारे ₹2,64,000/- किंमतीचे चोरीचे 18 मोबाईल जप्त केले आहेत. या प्रकरणी पिंपळगाव रेणुकाई येथील राजु साहेबराव नरवाडे या 32 वर्षीय आरोपीताला अटक करण्यात आली आहे.
नेमके काय घडले?
दिनांक 28/09/2025 रोजी पोलीस स्टेशन पारध येथे कर्तव्यावर असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांना गोपनीय माहिती मिळाली की, पिंपळगाव रेणुकाई येथील रहिवासी असलेला आरोपीत राजु नरवाडे हा चोरीचे मोबाईल विकत आहे. माहिती मिळताच, पोउपनि नेमाने, पोअ/156 निकम, पोअ/853 जाधव, पोअ/110 जाधव या कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात आले आणि त्यांना तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले.
सपोनि एस.डी. माने यांच्या आदेशाने पोउपनि नेमाने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तत्काळ पिंपळगाव रेणुकाई येथे छापा टाकला. आणि आरोपीताचा परिचय करून त्याची विचारपूस केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र अधिक विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर त्याने कबूल केले की, त्याच्याकडील मोबाईल चोरीचे असून ते त्याने छत्रपती संभाजीनगर येथून आणले आहेत. तसेच, या मोबाईलचे कोणतेही बिल त्याच्याकडे नव्हते. पोलिसांनी आरोपीताच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपन्यांचे एकुण 18 मोबाईल हस्तगत केले, ज्यात VIVO (04), OPPO (04), Xiaomi MI (02), REDMI (02), POCO (02), ONE PLUS (01), REALME (01), INFINIX (01), आणि SAMSUNG (01) कंपन्यांच्या फोनचा समावेश आहे, ज्यांची एकूण किंमत ₹2,64,000/- इतकी आहे.
गुन्हा दाखल आणि तपास:
या प्रकरणी पोलीस अमलदार 156 गणेश किसनराव निकम यांच्या फिर्यादीवरून पारध पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोह/498 सिनकर हे करत आहेत.
वरिष्ठांचे मार्गदर्शन:
सदरची यशस्वी कारवाई अजयकुमार बंन्सल (पोलीस अधिक्षक, जालना), आयुष नोपाणी (अप्पर पोलीस अधिक्षक, जालना), नितीन कटेकर (उपविभागीय पोलीस अधिकारी, भोकरदन) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि एस.डी. माने, पोउपनि व्ही.एस. नेमाने, पोअ/853 संतोष जाधव, पोअं 156 गणेश निकम, पोअ/110 जाधव यांनी पार पाडली आहे.
अधिक माहितीसाठी किंवा चोरीच्या मोबाईलबाबत काही तक्रार असल्यास, नागरिकांनी पारध पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.