Jalna Crime News :गरम केलेल्या लालबुंद लोखंडी रॉडने अंगाला चटके देत शेतकऱ्यास जीवे मारण्याचा प्रयत्न; जालना जिल्ह्यातील प्रकार
By तेजराव दांडगे
Jalna Crime News :गरम केलेल्या लालबुंद लोखंडी रॉडने अंगाला चटके देत शेतकऱ्यास जीवे मारण्याचा प्रयत्न; जालना जिल्ह्यातील प्रकार
पारध, दि. 28: भोकरदन तालुक्यातील अन्वा गावात जुन्या वादातून शेतकऱ्याला लोखंडी रॉड चुलीत तापवून लाल बुंद झालेल्या रॉडने अंगाला अनेक ठिकाणी चटके देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा अमानुष प्रकार समोर आल्यानंतर फिर्यादी कैलास गोविंदा बोराडे यांच्या तक्रारीवरून पारध पोलिसांनी गुरुवारी दि. 27 रोजी रात्री उशिरा दोघांविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा नोंदविला आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भोकरदन तालुक्यातील अन्वा येथील कैलास गोविंदा बोराडे वय 36 यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी दि. 26 रोजी जानेफळ गायकवाड रस्त्यावरील वटेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. त्यावेळी जुन्या वादाच्या कारणावरून माजी जिल्हा परिषद सदस्य तथा एका राजकीय पक्षाचे तालुका प्रमुख नवनाथ सुदाम दौड यांच्या सांगण्यावरून सोनू उर्फ भागवत सुदाम दौड रा. जानेफळ गायकवाड यांनी चुलीत लोखंडी रॉड गरम करून अंगाला, पायाला, मानेवर, हातांच्या तळव्यावर, शौचालयाच्या ठिकाणी चटके देऊन गंभीर जखमा करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शिवाय चापट बुक्क्याने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अशा फिर्यादी वरून पारध पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलामाखाली गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने, उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने करीत हे आहे.
बातमी अपडेट होत आहे…..