जालना शहराला बसला अतिवृष्टीचा फटका, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केली पाहणी
By तेजराव दांडगे

जालना शहराला बसला अतिवृष्टीचा फटका, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केली पाहणी
जालना, २२ सप्टेंबर – जालना शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी आज बाधित भागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
यावेळी त्यांनी जालना बसस्थानक परिसर, कोठारी नगर, भाग्यनगर, आणि भोईपुरा यांसारख्या अतिशय प्रभावित भागांची पाहणी केली. पूरग्रस्त नागरिकांशी त्यांनी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या संकटात झालेल्या जीवित आणि वित्तहानीबद्दल मित्तल यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांस दिले.
या पाहणी दौऱ्यात महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. या घटनेमुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करून नागरिकांना लवकरात लवकर मदत पुरवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा वेगाने काम करत आहे.