Jalna: शेतकऱ्याचे अपहरण करून २५ लाख रुपयांची खंडणी मागणारे ५ दरोडेखोर जेरबंद
By तेजराव दांडगे

Jalna: शेतकऱ्याचे अपहरण करून २५ लाख रुपयांची खंडणी मागणारे ५ दरोडेखोर जेरबंद
जालना, दि. 30:- घटनाक्रम: २२ मार्च २०२५ रोजी पहाटे १.३० वाजता मौजपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानोरा येथील शेतकरी निवृत्ती तांगडे हे त्यांच्या घराबाहेर झोपले होते. ५ ते ७ अज्ञात चोरट्यांनी त्यांचे तोंड दाबून त्यांचे अपहरण केले आणि त्यांच्या गाडीत टाकून जालना-मंठा महामार्गाने जालनाच्या दिशेने नेले. चोरट्यांनी तांगडे यांच्या खिशातील १५,००० रुपये काढून घेतले आणि जिवे न मारता सोडण्यासाठी २५ लाख रुपयांची खंडणी मागितली.
तांगडे घाबरल्याने त्यांनी खंडणी देण्याचे मान्य केले. चोरट्यांनी त्यांना घोडेगाव फाट्याजवळ सोडून दिले. त्यानंतर, दुपारी ४ वाजता चोरट्यांनी तांगडे यांना फोन करून २५ लाख रुपये खंडणी देण्याची धमकी दिली, अन्यथा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. त्यानंतर तांगडे यांनी मौजपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांची कारवाई:
पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
डुकरी पिंपरी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली.
पोलिसांनी खालील ५ आरोपींतांना अटक केली:
1) गणेश तात्याराव श्रीखंडे (सावरगाव हडप)
2) रामप्रसाद ऊर्फ बाळू दिगंबर शिंदे (सावरगाव हडप)
3) आकाश अशोक घुले (मुकर्कीदपूर, नेवासा फाटा, अहिल्यानगर)
4) विशाल ऊर्फ गजानन डोंगरे (सावरगाव हडप)
5) आकाश तुकाराम रंधवे (हडप)
आरोपींतांकडून गुन्ह्यात वापरलेली स्कार्पिओ गाडी (एमएच-२३-एएस-७२७२) आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले. एकूण ९,८०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींतांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. या प्रकरणात अनिकेत गोरख उकांडे आणि शाम चव्हाण हे फरार आरोपीत आहेत.
तपासातील माहिती:
अनिकेत गोरख उकांडे (अकोलनेर, अहिल्यानगर) आणि शाम चव्हाण (साळेगाव तांडा, खरपुडी, जालना) यांच्या मदतीने गुन्हा केल्याचे आरोपींतांनी कबूल केले आहे.
पोलिसांचे पथक:
सदरची कारवाई ही अजयकुमार बन्सल (पोलीस अधीक्षक, जालना), आयुष नोपाणी (अप्पर पोलीस अधीक्षक, जालना), दादाहरी चौरे (उपविभागीय पोलीस अधिकारी, परतूर), पंकज जाधव (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जालना), मिथुन घुगे (सपोनि तथा प्रभारी अधिकारी, मौजपुरी पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विजय तडवी, ग्रे. पोउपनि जाधव, सफौ/चंद्रकांत पवार, ज्ञानोबा बिरादार, मच्छिंद्र वाघ, दिलीप गोडबोले, नितीन खरात, राजेंद्र देशमुख, भास्कर वाघ, सतिष गोफणे, नितीन कोकणे, प्रदिप पाचरणे, अविनाश मांटे, धोंडीराम वाघमारे, प्रशांत म्हस्के, सदाशिव खैरे, कैलास शिवणकर, सागर बावीस्कर (तांत्रिक विश्लेषण, स्थानिक गुन्हे शाखा) यांनी केली आहे.
सद्यस्थिती:
या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.