जालना, बीड, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून तडीपार गुंड प्रल्हाद उर्फ पिंटू सुभाष मरकड गोंदी पोलिसांच्या जाळ्यात
By गौतम वाघ

जालना, बीड, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून तडीपार गुंड प्रल्हाद उर्फ पिंटू सुभाष मरकड गोंदी पोलिसांच्या जाळ्यात
गोंदी, जालना: जालना जिल्ह्यातील गोंदी पोलिसांनी तडीपार गुंड प्रल्हाद उर्फ पिंटू सुभाष मरकड याला अटक केली आहे. प्रल्हाद मरकड याला जालना, बीड आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून नऊ महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र, त्याने आदेशाचे उल्लंघन करून गोंदी गावात अनधिकृतपणे प्रवेश केला.
गोंदी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद मरकड हा शुक्रवारी (4 एप्रिल 2025) सायंकाळी 6.40 वाजण्याच्या सुमारास गोंदी गावात त्याच्या घराच्या परिसरात आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रल्हाद मरकड याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत करत आहेत.