महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त वंचित बहुजन आघाडी बुलढाणा तालुका पदाधिकारी यांचे वतीने विनम्र अभिवादन
By अनिल जाधव

महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त वंचित बहुजन आघाडी बुलढाणा तालुका पदाधिकारी यांचे वतीने विनम्र अभिवादन
धाड:ता.जि.बुलढाणा येथे आज महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या धाड येथील पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून, वंचित बहुजन आघाडी बुलढाणा तालुका पदाधिकारी यांचे वतीने महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
अभिवादन करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय धाड, सरपंच, सचिव व सदस्य मंडळी उपस्थित होती. त्याचप्रमाणे धाड येथील उपासक उपासिका आणि लहान बालकबालीका हे सर्व पांढरे वस्त्र परिधान करून महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. विशेष म्हणजे कि, वंचित बहुजन आघाडी बुलढाणा तालुका पदाधिकारी, वंबआ बुलढाणा तालुका अध्यक्ष मनोज खरात, महासचिव अनिल जाधव, उपाध्यक्ष युसुफ खान, उपाध्यक्ष किरण गवई, उपाध्यक्ष बाळु पानपाटील, सदस्य दादाराव खरात, विजुभाऊ गुजर, किशोर बोर्डे, उत्तम थोरात, दिपक बोर्डे, उज्वल थोरात आणि वंबआ चे जेष्ठ कार्यकर्ते सत्यवान बोर्डे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



