शिवसेनेच्या संघटनात्मक बैठकांना प्रचंड प्रतिसाद; अंबादास दानवे यांचा कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र
By गौतम वाघ

शिवसेनेच्या संघटनात्मक बैठकांना प्रचंड प्रतिसाद; अंबादास दानवे यांचा कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र
जालना, दि. ३० (प्रतिनिधी) – निवडणुका असोत वा नसोत, पक्ष संघटना मजबूत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पक्ष संघटना बळकट असेल, तर सर्व निवडणुका जिंकता येतात, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. जालना शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित संघटनात्मक आढावा बैठकांना कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
अंबादास दानवे यांचा विजयाचा कानमंत्र
जालना शहरात हॉटेल मधबुन आणि हॉटेल अमित येथे झालेल्या या बैठकांमध्ये दानवे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “आगामी निवडणुकांमध्ये आपल्यातीलच अनेक जण उमेदवार असतील आणि भावी लोकप्रतिनिधीही आपणच असू. त्यामुळे प्रत्येकाने पक्ष संघटनेचे काम आवडीने करावे. कोणतेही काम केवळ पदासाठी किंवा स्वार्थासाठी न करता, जनसेवेसाठी करावे.” त्यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्याला आपल्या पदाला न्याय देण्याचे आवाहन केले, कारण सद्यस्थितीतील स्पर्धेत टिकण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. येणाऱ्या निवडणुका हे आपले महत्त्वाचे उद्दिष्ट असून, ते साध्य करण्यासाठी प्रत्येकाने झटून काम करावे, असेही त्यांनी नमूद केले.
जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांचे मार्गदर्शन
यावेळी जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी जालना शहरातील दोन्ही बैठकांना उपस्थित असलेले पदाधिकारी निष्ठावंत आणि विश्वासू असल्याचे सांगितले. पक्षाच्या कठीण काळात हे सर्वजण पक्षाच्या पाठीशी ताकदीने उभे राहिले, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शहरातील तिन्ही शहरप्रमुख चांगल्या प्रकारे काम करत असून, संघटना मजबूत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
अंबेकर यांनी पदाधिकाऱ्यांना आपापल्या क्षेत्रातील सर्व बुथप्रमुख, गटप्रमुख, शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि उपविभागप्रमुखांच्या नियुक्त्या झाल्याची खात्री करण्यास सांगितले. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आपल्या क्षेत्रातील निवडणूक याद्यांचे वाचन करणे, स्थलांतरित मतदार आणि मृत मतदारांची माहिती अद्ययावत करणे यावर लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले. अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाचा पक्ष संघटना मजबूत होण्यासाठी निश्चितच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता निष्ठेने पक्षाचे कार्य करावे, असे आवाहनही अंबेकर यांनी केले.
या बैठकांना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, उपनेते लक्ष्मणराव वडले, उपजिल्हाप्रमुख मुरलीधर शेजुळ, माजी सभापती मुरलीधर थेटे, बाबुराव पवार, तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, शहरप्रमुख बाला परदेशी, दुर्गेश काठोठीवाले, घनश्याम खाकीवाले, बाजार समितीचे माजी संचालक तुळशीदास काळे यांच्यासह माजी नगरसेवक संदीप झारखंडे, संदीप नाईकवाडे, सखाराम मिसाळ, जे.के. चव्हाण, विजय शेंदरकर, रविकांत जगधने, राजू खर्डेकर, महादेव कावळे, जान महम्मद कुरेशी, निखिल धारेगावकर, घनश्याम कुमठे, नंदुसिंग राजपूत, बजरंग राजपूत, शेख नईम, अनिल अंभोरे, अजय रोडीये, गजानन मगर, जयदेव काळे, दर्शन चौधरी, जय छाबडा, राम जाधव, आशिष बोकण, परमेश्वर घोलप, तुकाराम भुतेकर, सय्यद इम्रान, गणेश लाहोटी, दीपक भालेराव, कुरकण सय्यद, आकाश टेकूर, रमेश तुंगेवार, शुभम गायकवाड, अंकित बाहिती, गोपीकिशन उबाळे, कृष्णा तापडिया, राजू वैद्य, अरुण हिवराळे, तुळजाराम माधवले, चुन्नूसिंग पहेलवान आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव रजनीकांत इंगळे आणि जालना येथील शरद पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला.