
जिल्हा कारागृहात आरोग्य शिबीर संपन्न
जालना, दि. 11: जिल्हा कारागृह वर्ग-1 व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रिसर्च सेंटर प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कारागृह वर्ग-1 येथे कैदयांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे –वाघ, जिल्हा कारागृहाचे अधिक्षक काळे, जिल्हा सरकारी वकील बी. व्ही. इंगळे, डॉ. रितेश अग्रवाल, डॉ. विपुल जैन, डॉ. विजय जाधव, धनसिंह सुर्यवंशी, विजय लिणार, कैलास पवार, ॲङ लक्ष्मण उढाण, ईश्वर बिल्होरे, कार्तिक मदन व विशाल वाघमारे यांची उपस्थिती होती.
यावेळी शिबीरात कारागृहात कैद्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली या ई. सी. जी. , बी. पी. शुगर तपासणी करण्यात आली. हाडांचे आजार व त्वचेचे आजार यांची तपासणी व त्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.