
जिल्हाधिकारी कार्यालयात वसंतराव नाईक यांना अभिवादन
जालना दि. 01: राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, तहसिलदार अनिल नव्हाते, नायब तहसिलदार सतिश तायडे, महसुल सहायक रविंद्र हेलगर, देवानंद डोईफोडे, अरुण डुकरे, दिपाली राऊत, संपदा कुलकर्णी, वैशाली डिघुळे तसेच प्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.