छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राजर्षी शाहू विद्यालयाची भव्य शोभायात्रा
By तेजराव दांडगे
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राजर्षी शाहू विद्यालयाची भव्य शोभायात्रा
पारध, दि. 19:- भोकरदन तालुक्यातील पारध बु येथील भिलदरी बहुउद्देशीय संस्थेच्या राजर्षी शाहू विद्यालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावामधून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. महर्षी पराशर ऋषी मंदिरापासून शोभा यात्रेला सुरुवात झाली.
या शोभायात्रेमध्ये विद्यालयाचा विद्यार्थी ओम संतोष दांडगे याने छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा साकारली होती. तर साई कृष्णा लोखंडे याने छत्रपती संभाजी महाराज यांची वेशभूषा साकारली होती.यासह ढोल पथक, लेझीम पथक, सहभागी झाले होते.
या शोभायात्रेमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम डोईफोडे, मुख्याध्यापक विलास लोखंडे, प्राचार्या साधना टेकाळे, कार्यालयीन अधीक्षक किशोर वाघ, उपप्राचार्य अमोल बांडगे, उपमुख्याध्यापक विवेक अवसरमोल, तसेच राजर्षी शाहू शैक्षणिक संकुलातील सर्व कर्मचारी वर्ग यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.