ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त धाड रुग्णालयात फळ वाटप
By अनिल जाधव

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त धाड रुग्णालयात फळ वाटप
धाड/बुलढाणा, १० मे २०२५: वंचित बहुजन आघाडीचे नेते, श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या ७१व्या वाढदिवसानिमित्त, आज धाड येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे आणि बिस्किटे वाटप करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीच्या बुलढाणा तालुका कार्यकारिणीने या उपक्रमाचे आयोजन केले होते. रुग्णांना लवकर बरे वाटावे आणि त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी धाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चाटे आणि त्यांचा संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता. रुग्णांना फळे आणि बिस्किटे वाटप करण्यासाठी बुलढाणा तालुका कार्यकारिणीचे अध्यक्ष मनोज खरात, महासचिव अनिल जाधव, उपाध्यक्ष किरण गवई, तसेच तालुका कार्यकारिणीतील पदाधिकारी बाळू पानपाटील, सुनील ब्राम्हणे, प्रकाश गुजर, विजूभाऊ गुजर, पवन यंगड, अशोक दांडगे, रमेश खरात, समाधान खरात आणि धाड परिसरातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे रुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.