मक्काच्या गंजीला आग: शेतकऱ्याचे मोठे नुकसान, तातडीने भरपाई देण्याची मागणी
By तेजराव दांडगे

मक्काच्या गंजीला आग: शेतकऱ्याचे मोठे नुकसान, तातडीने भरपाई देण्याची मागणी
भोकरदन: तालुक्यातील नळणी खुर्द येथील शेतकरी रावसाहेब वराडे यांच्या शेतातील दोन एकरातील मक्काच्या गंजीला आग लागल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भोकरदन उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांनी तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नळणी खुर्द येथील शेतकरी रावसाहेब धोंडीबा वराडे यांच्या दोन एकर शेतातील मक्याची गंजी अज्ञात कारणांमुळे जळून खाक झाली. यामुळे वराडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांनी शिवसैनिकांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली. त्यांनी वराडे कुटुंबीयांना धीर देत शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
ठोंबरे यांनी मागणी केली आहे की, “शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने याची तातडीने दखल घेऊन पंचनामा करावा आणि रावसाहेब वराडे यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी.”