गळफास घेतल्याने शेतकऱ्याचा मृत्यू: जालना जिल्ह्यातील घटना
By तेजराव दांडगे

गळफास घेतल्याने शेतकऱ्याचा मृत्यू: जालना जिल्ह्यातील घटना
जालना, 06 ऑगस्ट: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे आज दुपारी एका 65 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कौतिकराव मोतीराम सपकाळ (वय 65) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
अशोक तोताराम सपकाळ (वय 45) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी 3.00 वाजेच्या सुमारास कौतिकराव सपकाळ यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतातील गट क्रमांक 222 मधील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पारध पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या आदेशानुसार, पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. सी. खिल्लारे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सध्या तरी आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, कौतिकराव सपकाळ यांच्या आत्महत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.