डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून शेतकऱ्यांसाठी १२ कोटींचा निधी उपलब्ध: अनुसूचित जाती/नवबौद्ध शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन!by
By तेजराव दांडगे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून शेतकऱ्यांसाठी १२ कोटींचा निधी उपलब्ध: अनुसूचित जाती/नवबौद्ध शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन!
जालना, दि. 01: जालना जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेला तब्बल १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
शेतीला सक्षम बनवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेमुळे अनुसूचित जाती/नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे, पात्र शेतकऱ्यांनी त्वरित संबंधित विभागाशी संपर्क साधून या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.