आपला जिल्हाजालना जिल्हामहत्वाचे
Trending

Jalna: जिल्ह्यातील टंचाईग्रस्त 158 गावात पाणी उपसा करण्यास बंदी, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे आदेश जारी

By तेजराव दांडगे

CSC मार्फत रोजगाराभिमुख कोर्सेस: प्रशिक्षण घ्या, प्रमाणपत्र मिळवा आणि करिअर घडवा! – संपर्क करा :- तेजराव दांडगे_ ९६०४०८४०६६, ७७७५९८६५९८ विविध कोर्स 1. ऑप्टिकल फायबर स्प्लायसर (OFS) कोर्स, 2) DTH सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन व सर्व्हिस टेक्निशियन, 3. CCTV इन्स्टॉलेशन टेक्निशियन कोर्स,  4. स्मार्ट मीटर असिस्टंट टेक्निशियन कोर्स, 5. उषा शिवणकाम व टेलरिंग कोर्स, डिजिटल वेलनेस कोर्स, 7. सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकास कोर्स असे विविध कोर्स आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी या चालणाऱ्या पट्टी लिंक वर क्लिक करा 

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे आदेश जारी, जिल्ह्यातील टंचाईग्रस्त 158 गावात पाणी उपसा करण्यास बंदी

जालना, दि . 17:– महाराष्ट्र भूजल पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनासाठी विनिमय अधिनियम-2009 अन्वये वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई भासणाऱ्या गावांचा अहवाल सादर केला असून त्यात जिल्ह्यातील एकुण 158 गावे टंचाईग्रस्त दर्शविली आहेत. तरी जालना जिल्ह्यातील टंचाईग्रस्त 158 गावात 30 जुन 2025 पर्यंत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या उदभवावर प्रतिकुल परिणाम करणाऱ्या विहिरीमधील पाणी उपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे,  असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

जिल्ह्यातील जालना तालुक्यातील 40, जाफ्राबाद तालुक्यातील 26, भोकरदन तालुक्यातील 54, बदनापूर तालुक्यातील 14 आणि अंबड तालुक्यातील 24 असे एकुण 158 गावांचा टंचाई भासणाऱ्या गावात समावेश करण्यात आलेला आहे. आदेशाचा भंग केल्यास महाराष्ट्र भूजल अधिनियम-2009 मधील तरतुदीनूसार योग्य ती दंडात्मक कार्यवाही करण्याचे अधिकार वापरण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी व संबंधित तहसीलदारांना आदेशाद्वारे प्राधिकृत करण्यात आले आहे. तरी टंचाईग्रस्त गावात भूजल अधिनियम-2009 नुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.  असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

परिशिष्‍ट अ

जालना जिल्‍हयातील पाणी उपसा करण्‍यास बंदी घातलेल्‍या गावांची यादी सन २०२४-२५

अ.क्र. तालुका गावाचे नाव  अ.क्र. तालुका गावाचे नाव अ.क्र. तालुका गावाचे नाव
1 2 3 4 5 6 7 8 9
1 जाफ्राबाद चापनेर/धोंडखेडा 26 जाफ्राबाद काचनेरा 51 जालना रोहणवाडी
2 जाफ्राबाद शिराळा 27 जालना बठाण बु 52 जालना सोमनाथ जळगाव तांडा
3 जाफ्राबाद वाढोणा 28 जालना वझर 53 जालना सावंगी तलाव
4 जाफ्राबाद भारज बु 29 जालना नसडगाव 54 जालना निरखेडा
5 जाफ्राबाद आंबेगाव 30 जालना पाचनवडगाव 55 जालना खांबेवाडी
6 जाफ्राबाद घानखेडा 31 जालना कोळवाळी 56 जालना तांदुळवाडी खु.
7 जाफ्राबाद आरदखेडा 32 जालना तांदुळवाडी बु. 57 जालना थेरगाव
8 जाफ्राबाद गोकुळवाडी 33 जालना पाथ्रड तांडा 58 जालना वानडगाव
9 जाफ्राबाद नळविहीरा 34 जालना सेवली 59 जालना हस्‍तेपिंपळगाव
10 जाफ्राबाद माहोरा 35 जालना पळसखेडा/कैलासनगर 60 जालना लोंढेवाडी
11 जाफ्राबाद रेपाळा 36 जालना एरंडवडगाव 61 जालना रेवगाव
12 जाफ्राबाद ब्रम्‍हपुरी 37 जालना बोरगाव 62 जालना रामनगर
13 जाफ्राबाद म्‍हसरुळ 38 जालना शंभुसावरगाव 63 जालना विरेगाव
14 जाफ्राबाद पापळ 39 जालना पिंपळवाडी 64 जालना माळीपिंपळगाव
15 जाफ्राबाद हिवरा काबळी 40 जालना हिस्‍वन बु   65 जालना देवमुर्ती
16 जाफ्राबाद हिवराबळी 41 जालना हिस्‍वन खु 66 जालना खरपुडी
17 जाफ्राबाद      शिंदी 42 जालना इस्‍लामवाडी 67 भोकरदन धोंडखेडा
18 जाफ्राबाद भारज खु 43 जालना वरखेड सेवली 68 भोकरदन वडोदतांगडा
19 जाफ्राबाद डावरगाव 44 जालना पाष्‍टा 69 भोकरदन आन्‍वा
20 जाफ्राबाद पिंपळगाव कड 45 जालना धानोरा 70 भोकरदन आन्‍वा कार्लावाडी
21 जाफ्राबाद डोणगाव 46 जालना बेथलम 71 भोकरदन वालसावंगी
22 जाफ्राबाद नळविहीरा 47 जालना सावरगाव भा./बिबी 72 भोकरदन मालेगाव
23 जाफ्राबाद सातेफळ /इस्‍लामवाडी 48 जालना बाजीउम्रद 73 भोकरदन करजगाव
24 जाफ्राबाद दळेगव्‍हाण 49 जालना बाजीउम्रद तांडा 74 भोकरदन नळणी वाडी
25 जाफ्राबाद सांजोळ/आनंदवाडी 50 जालना जामवाडी फुलेनगर 75 भोकरदन देहेड
अ.क्र. तालुका गावाचे नाव  अ.क्र. तालुका गावाचे नाव अ.क्र. तालुका गावाचे नाव
1 2 3 4 5 6 7 8 9
76 भोकरदन कोदा 104 भोकरदन कुंभारी 132 बदनापूर गोकुळवाडी
77 भोकरदन आलापुर 105 भोकरदन इब्राहिमपुर 133 बदनापूर धामणगाव
78 भोकरदन आन्‍वापाडा 106 भोकरदन ताडकळस 134 बदनापूर मालेवाडी वस्‍ती
79 भोकरदन वाडी बु. 107 भोकरदन लिंगेवाडी 135 अंबड कोळी सिरसगाव
80 भोकरदन वाडी खु 108 भोकरदन आव्‍हाणा/ढोलेवाडी 136 अंबड राहुवाडी (गंगारामवाडी )
81 भोकरदन नळणी बु. 109 भोकरदन आव्‍हाणा 137 अंबड डावरगाव
82 भोकरदन जळगाव सपकाळ 110 भोकरदन दावतपूर 138 अंबड बारसवाडा
83 भोकरदन कोठा कोळी 111 भोकरदन गव्‍हाण संगमेश्‍वर 139 अंबड गोरी गंधारी
84 भोकरदन वरुड बु 112 भोकरदन बाभुळगाव 140 अंबड भनंग जळगाव
85 भोकरदन मालखेडा 113 भोकरदन भिवपुर 141 अंबड सारंगपूर
86 भोकरदन नळणी  बु.   नविन नळणी 114 भोकरदन चौराळा 142 अंबड ढालसखेडा
87 भोकरदन पिंपळगाव शेरमुलखी 115 भोकरदन मासनपुर 143 अंबड भांबेरी
88 भोकरदन चांदई टेपली 116 भोकरदन वाढोणा 144 अंबड दहयाळा
89 भोकरदन वजीरखेडा 117 भोकरदन विझोरा 145 अंबड शेवगा
90 भोकरदन देऊळगाव कमान 118 भोकरदन पारध बु. 146 अंबड धाकलगाव
91 भोकरदन पळसखेडा ठोंबरे 119 भोकरदन पारध खु 147 अंबड नागझरी
92 भोकरदन सिरसगाव वा. 120 भोकरदन आडगाव 148 अंबड अंतरवाली सराटी
93 भोकरदन जवखेडा खु. 121 बदनापूर दाभाडी 149 अंबड लकमापुरी
94 भोकरदन रजाळा पंढरपुर 122 बदनापूर दाभाडी हिवरा 150 अंबड बोरी
95 भोकरदन रजाळा पंढरपुरवाडी 123 बदनापूर राजेवाडी रमदुलवाडी 151 अंबड मठपिंपळगाव
96 भोकरदन विरेगाव 124 बदनापूर अकोला 152 अंबड वलखेड
97 भोकरदन भायडी 125 बदनापूर खामगाव 153 अंबड सोनकपिंपळगाव
98 भोकरदन गारखेडा जोमाळा 126 बदनापूर रांजणगाव 154 अंबड धनगरपिंप्री
99 भोकरदन गारखेडा 127 बदनापूर आन्‍वी राळा 155 अंबड लोणार भायगाव
100 भोकरदन विटा/रामनगर 128 बदनापूर विल्‍हाडी 156 अंबड भालगाव
101 भोकरदन तांदुळवाडी 129 बदनापूर मात्रेवाडी 157 अंबड नालेवाडी
102 भोकरदन नळणी खु 130 बदनापूर खडकवाडी 158 अंबड लालवाडी
103 भोकरदन तडेगाव 131 बदनापूर देवपिंपळगाव    

D9 News मराठी

सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??