लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती सावळी येथे उत्साहात साजरी
By अनिल जाधव

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती सावळी येथे उत्साहात साजरी
धाड, दि. ०१: धाडजवळील सावळी गावात वंचित बहुजन आघाडी, बुलढाणा तालुका यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम ग्रामपंचायत भवन, सावळी येथे पार पडला.
यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच तेजराव नरवाडे, त्यांच्यासोबत इतर सदस्य आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर सरपंच तेजराव नरवाडे, वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा तालुका अध्यक्ष मनोज खरात आणि महासचिव अनिल जाधव यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छाही दिल्या.
या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीच्या बुलढाणा तालुका कार्यकारिणीतील उपाध्यक्ष किरण गवई, युसूफ खान, प्रकाश गुजर, धाड शहर अध्यक्ष विजय गुजर आणि बाळा पानपाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास अवसरमोल आणि रामेश्वर अवसरमोल यांनी केले.