आपला जिल्हाजालना जिल्हाताज्या घडामोडी
पारध बुद्रुक ग्रामपंचायतीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
By तेजराव दांडगे

पारध बुद्रुक ग्रामपंचायतीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
पारध बुद्रुक: येथील ग्रामपंचायतीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदराने अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा आणि त्यांच्या समाज प्रबोधनाच्या कार्याचा गौरव करून, त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.