
D9 न्यूज मराठी – आजच्या ठळक घडामोडी
राष्ट्रीय:
1) अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द: भारताची कठोर भूमिका; ४८ तासात देश सोडण्याचे आदेश.
2) भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही: गृहमंत्री अमित शाह यांचा कणखर इशारा.
3) हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक: हॉटेलमध्ये सुरक्षित मुक्काम.
4) “हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय”: रॉबर्ट वाड्रा यांची प्रतिक्रिया.
5) पहलगाम दहशतवादी हल्ल्यात कामोठेचे सुबोध पाटील जखमी: मानेला गोळी चाटून गेली; सुदैवाने बचावले.
6) १५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट: पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटकांचा बेत रद्द.
7) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कायदेशीरच: केंद्रीय निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; विरोधकांच्या आरोपांना पूर्णविराम.
राजकीय: मुंबईत मे पासून लोकल, मेट्रो, बेस्टचा प्रवास एकाच तिकिटावर: मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा; प्रवाशांना मोठा दिलासा.
अर्थव्यवस्था: उन्हाचा चटका वाढल्याने लिंबांना आला ‘भाव’, एक लिंबू ८ ते १० रुपयांना: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री.
गुन्हेगारी/ अपघात: मुंबई-पुणे महामार्गावरील अपघात घटले, ‘समृद्धी’वर वाढले: ७० टक्क्यांनी मृत्यूंच्या संख्येत घट; समृद्धी महामार्गावरील वाढती दुर्घटना चिंताजनक.
हवामान: सोलापूर बनलं शोलापूर: सोलापुरातील तापमानाचा पारा पोहोचला ४३.८ अंशावर; उष्णतेची लाट तीव्र.
क्रीडा: Rohit Sharma Record: ९ वर्षांनी हिटमॅनच्या भात्यातून आली बॅक टू बॅक फिफ्टी! खास विक्रमाला गवसणी.