Top Newsमहत्वाचेमहाराष्ट्र

D9 News Marathi आजच्या ठळक घडामोडी: ०४ जुलै २०२५

D9 News Marathi Today's Highlights: 04 July 2025

CSC मार्फत रोजगाराभिमुख कोर्सेस: प्रशिक्षण घ्या, प्रमाणपत्र मिळवा आणि करिअर घडवा! – संपर्क करा :- तेजराव दांडगे_ ९६०४०८४०६६, ७७७५९८६५९८ विविध कोर्स 1. ऑप्टिकल फायबर स्प्लायसर (OFS) कोर्स, 2) DTH सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन व सर्व्हिस टेक्निशियन, 3. CCTV इन्स्टॉलेशन टेक्निशियन कोर्स,  4. स्मार्ट मीटर असिस्टंट टेक्निशियन कोर्स, 5. उषा शिवणकाम व टेलरिंग कोर्स, डिजिटल वेलनेस कोर्स, 7. सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकास कोर्स असे विविध कोर्स आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी या चालणाऱ्या पट्टी लिंक वर क्लिक करा 

D9 News Marathi आजच्या ठळक घडामोडी: ०४ जुलै २०२५

मराठवाड्यात २.२६ लाख कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप: मराठवाड्यात आतापर्यंत २ लाख २६ हजार कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

कोंढव्यात ६७ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त, १३.५० लाखांचा मुद्देमाल: पुण्यातील कोंढवा परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत ६७ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले. या कारवाईत १३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

बार्टीमार्फत जेईई आणि नीट प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू: बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) मार्फत जेईई (JEE) आणि नीट (NEET) परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

जालना-जळगाव रेल्वेमार्गासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण: जालना-जळगाव रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, तीन गावांमध्ये प्रत्यक्ष मोजणी सुरू आहे.

राज्यात १.८२ लाख कुपोषित बालके; मुंबई उपनगरात २,७७८ तीव्र कुपोषित: राज्यात सध्या १ लाख ८२ हजार कुपोषित बालकांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी २,७७८ तीव्र कुपोषित बालके मुंबई उपनगरात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पंढरपुरात वृद्धाचा अनैतिक संबंधांच्या माहितीवरून खून: पंढरपूर येथे अनैतिक संबंधाची माहिती उघड करेल या भीतीपोटी एका वृद्धाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गोदावरीवरील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे उघडले, पाणी तेलंगणात: गोदावरी नदीवरील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. बंधाऱ्यातून १०.०५ दशलक्ष घनमीटर पाणी तेलंगणा राज्यात सोडण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगरात २,६२२ मालमत्ता जमीनदोस्त, मनपा कारवाई सुरूच: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अतिक्रमणविरोधी मोहीम तीव्र केली असून, शहरातील तीन रस्त्यांवरील २,६२२ मालमत्ता जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. मनपाची ही कारवाई थांबणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

“स्वार्थासाठी ठाकरे बंधू एकत्र,” नारायण राणेंचा हल्लाबोल: नारायण राणे यांनी ठाकरे बंधूंना लक्ष्य करत, “हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी… फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!” असा गंभीर आरोप केला आहे.

नागपूर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक ७, ५२ दिवस बंद: प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावे, नागपूर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक ७ पुढील ५२ दिवस दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार आहे.

“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, समिती नको,” विजय वडेट्टीवारांची मागणी: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. यासाठी समिती स्थापन करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा, ४० केंद्रांवर गुन्हा: उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावावर नांदेडमध्ये पीक विमा काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात परळी येथील ९ जणांचा समावेश आहे.

पुण्यात घरात घुसून तरुणीवर बलात्कार, मोबाईलवर फोटो काढले: पुण्यात एका उच्चभ्रू सोसायटीत घरात घुसून एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने तरुणीच्या मोबाईलवर तिचे फोटोही काढले. पीडित तरुणी संगणक अभियंता आहे.

‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख रुपये: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

देशभरात पावसाचे थैमान, हिमाचलमध्ये ढगफुटीने १४ ठार: देशभरात सध्या पावसाने थैमान घातले आहे. हिमाचल प्रदेशात ढगफुटीनंतर १४ जणांचा मृत्यू झाला असून, अद्याप ३१ जणांचा शोध सुरू आहे.

“पडळकर, सदावर्ते कुठे गेले?” अनिल परबांचा विधानपरिषदेत हल्लाबोल: अनिल परब यांनी विधानपरिषदेत पडळकर आणि सदावर्ते यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “पडळकर, सदावर्ते कुठे गेले? कुठं मांजर होऊन बसले? सदाभाऊ खोत १५ दिवस आझाद मैदानात झोपले; एसटी खड्ड्यात घातली,” असे परब म्हणाले.

“दुकानदाराने माफी मागितली तरी भाजपने मोर्चा काढला,” अविनाश जाधवांचा आरोप: मीरा-भाईंदरमधील मोर्चाबाबत अविनाश जाधव यांनी गंभीर आरोप केला आहे. “दुकानदाराने माझ्याकडे माफी मागितली पण भाजप नेत्यांनी मोर्चा काढायला लावला,” असे जाधव म्हणाले.

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मृत्यू अपघातीच: दिशा सालियन प्रकरणात मुंबई पोलिसांनी कोर्टात महत्त्वाची माहिती दिल्याने आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे. दिशाचा मृत्यू अपघातीच असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

“महाराष्ट्रात तीन महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या,” राहुल गांधींचे सरकारवर टीकास्त्र: राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. “महाराष्ट्रात फक्त तीन महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांनी गळ्याला दोरी लावली. ही आकडेवारी नसून उद्ध्वस्त घरे आहेत, आणि सरकार गप्प,” असे राहुल गांधी म्हणाले.

“महादेव मुंडेंना मारून हाडं, कातडं ठेवली,” पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंची मागणी: ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पती महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी बाळा बांगर यांचा जबाब घेऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. “महादेव मुंडेंना मारुन टेबलावर हाडं, कातडं ठेवली,” असे त्या म्हणाल्या.

“नाशिक शिवसेना पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे, भाजप गुन्हेगार भाजपत,” संजय राऊतांचा हल्लाबोल: संजय राऊत यांनी नाशिकमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल झाल्याचा आरोप केला आहे. “नाशिक शिवसेना पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल, अटकेच्या भीतीने सगळे फरार अन् तेच भाजप गुन्हेगार आता भाजपा प्रवेश करत आहेत,” असे राऊत म्हणाले.

पुण्यातील भोंदूबाबा प्रसादच्या आश्रमातून गोळ्यांची पाकिटे, आयपॅड जप्त: पुण्यातील भोंदूबाबा प्रसादच्या आश्रमात पोलिसांना वेगवेगळ्या गोळ्यांची पाकिटे आणि २ आयपॅड जप्त केले आहेत. आयपॅडमधील डेटा तपासण्याचे काम सुरू आहे.

कर्करोगामुळे लिंग गमावलेल्या तरुणावर यशस्वी प्लास्टिक सर्जरी: कर्करोगामुळे लिंग गमावलेल्या एका तरुणावर प्लास्टिक सर्जरीने यशस्वी पुनर्रचना करण्यात आली आहे. १० तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत ७ सर्जन सहभागी होते आणि ही देशातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया ठरली आहे.

“ही तर मतदान बंदी!” बिहारमध्ये मतदारयादीत मोठ्या प्रमाणात फेरफार: बिहारमध्ये निवडणुकीच्या तोंडावर मतदारयादीत मोठ्या प्रमाणात फेरफार झाल्याचा आरोप करत इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाच्या दारात धाव घेतली आहे. “ही तर मतदान बंदी!” असे ते म्हणाले.

शुभमन गिलच्या शतकी खेळीने टीम इंडियाची त्रिशतकी मजल: शुभमन गिलच्या शानदार ‘कॅप्टन’ इनिंगमुळे टीम इंडियाने पहिल्या दिवसाच्या खेळात त्रिशतकी मजल मारली आहे. यशस्वी जयस्वालनेही ८७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

“कायद्याचं राज्य आहे..!” शमी ४ लाखांची पोटगी देणार, हसीन जहाँची प्रतिक्रिया: क्रिकेटपटू मोहम्मद शमी ४ लाख रुपयांची पोटगी देणार असल्याच्या निर्णयावर त्याची माजी पत्नी हसीन जहाँने प्रतिक्रिया दिली आहे. “कायद्याचं राज्य आहे..!” असे ती म्हणाली.

आजचे सोन्याचे भाव:
२२ कॅरेट सोने: ९१,५६६/- प्रति तोळा
२४ कॅरेट सोने: ९९,८९१/- प्रति तोळा

D9 News मराठी

सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??