D9 News ब्रेकिंग: जालन्यात गोवंश मांसाची अवैध वाहतूक; ‘तो’ माल आणि बाईकसह आरोपीत जेरबंद!
By तेजराव दांडगे

D9 News ब्रेकिंग: जालन्यात गोवंश मांसाची अवैध वाहतूक; ‘तो’ माल आणि बाईकसह आरोपीत जेरबंद!
पारध, दि. २७ : महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे उल्लंघन करत गोवंश मांसाची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपीतांना भोकरदन तालुक्यातील पारध पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. आरोपीतांकडून सुमारे ६४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यात गोवंश मांस, वजन काटा आणि वाहतुकीसाठी वापरलेली मोटारसायकल यांचा समावेश आहे.
नेमकं काय घडलं?
दिनांक २७/११/२०२५ रोजी सकाळी सुमारे ९.४० वाजेच्या सुमारास, पारध पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष माने यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मौजे पिंपळगाव ते वाकडीआन्वा जाणारे रोडवर कल्याणी गावालगत, तेजासिंग खंडाळकर यांच्या शेताजवळ सापळा रचण्यात आला.
यावेळी शेख जावेद शेख खाजा (वय २५) आणि शेख अल्ताफ शेख इक्राम कुरेशी (दोघे रा. कठोरा बाजार, ता. भोकरदन, जि. जालना) यांना पोलिसांनी अडवले.
बाईकवर चालला होता ‘तो’ अवैध धंदा
पोलिसांना तपासणी दरम्यान, आरोपीत क्र. १ शेख जावेद हा कोणत्याही वैध परवान्याशिवाय, फॅशन प्रो कंपनीची काळ्या रंगाची (MH02DB6324) मोटारसायकल वापरत होता. या बाईकवर अंदाजे १५ किलो वजनाचे गोवंश जातीचे मांस विक्रीसाठी घेऊन जात असताना त्याला पकडण्यात आले.
पोलिसांच्या चौकशीत आरोपीत क्र. २ शेख अल्ताफ याने हे गोवंश मांस विक्रीसाठी कापून दिल्याची कबुली दिली आहे. यावरून या दोघांनी मिळून हा अवैध व्यापार चालवल्याचे उघड झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
जप्त केलेला मुद्देमाल
पोलिसांनी या कारवाईत खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे:
१५ किलो गोवंश मांस: अंदाजित किंमत ₹ ३,०००/-
वजन काटा: किंमत ₹ १,२००/- (धंद्यासाठी वापरला जाणारा)
वाहतूक करणारे ‘वाहन’: फॅशन प्रो मोटारसायकल (MH02DB6324) किंमत ₹ ६०,०००/-
जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत: ₹ ६४,२००/-
गुन्हा दाखल आणि पुढील तपास
या प्रकरणी, फिर्यादी पोकॉ संतोष गुलाबराव जाधव यांच्या तक्रारीवरून पारध पोलीस ठाण्यात गुरनं २८६/२०२५ नुसार भारतीय दंड संहिता (BNS-२०२३) च्या कलम ३२५, ३(५) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ च्या कलम ५(c) आणि ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सपोनि संतोष माने यांच्या आदेशाने, पुढील तपास पोहेकों/ पी.एन. सिनकर हे करत आहेत.
📢 D9 News Note: स्थानिक कायद्याचे उल्लंघन करून होणाऱ्या अशा अवैध कृत्यांवर पोलिसांची करडी नजर असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.



