पारधच्या युवकांचा स्तुत्य उपक्रम: अहिल्याबाई होळकरांना ३०० दिव्यांची मानवंदना!
By तेजराव दांडगे

पारधच्या युवकांचा स्तुत्य उपक्रम: अहिल्याबाई होळकरांना ३०० दिव्यांची मानवंदना!
पारध, दि. 31: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पारध येथील तरुणांनी एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम राबवत आपली आदरांजली वाहिली. गावातील उत्साही युवकांनी एकत्र येत तब्बल ३०० पणत्या प्रज्वलित करून अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.
अहिल्याबाई होळकर यांनी केलेल्या लोककल्याणकारी कार्याची, त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची आणि धार्मिक निष्ठांची आठवण म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या ३०० पणत्यांच्या रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता आणि एक भक्तीमय तसेच प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी युवकांनी अहिल्याबाईंच्या कार्याची महती विषद केली आणि त्यांच्या आदर्शांवर चालण्याचे आवाहन केले. या उपक्रमाचे गावातील नागरिकांनीही कौतुक केले असून, यामुळे तरुण पिढीला इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांची ओळख होऊन प्रेरणा मिळेल, असे मत व्यक्त करण्यात आले.
पारधच्या युवकांनी राबवलेला हा उपक्रम अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिलेली एक सुंदर आणि अविस्मरणीय मानवंदना ठरली.