अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी फोटोग्राफर संघटनेने दिली स्वयंघोषीत फोटोग्राफरच्या विरोधात तक्रार…
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील फोटोग्राफर युनियनचा सदस्य अनंत ज्ञानेश्वर पाटील यांना दूरध्वनीवरून अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी अमळनेर पोलिसात युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार दिली आहे.
चोपडा येथील फोटोग्राफर जाकीर बाबाल (फोकस फोटोग्राफी) रा.आझाद चौक, कुवेर अली (फोकस फोटोग्राफी)आजाद चौक, चोपडा वसीम तेली फोकस फोटोग्राफी,रा.आजाद चोक, मोठया मस्जिद जवळ, चोपडा, यांचा तक्रारीत समावेश आहे त्यात दिलेल्या माहितीनुसार वसीम तेली हा कुठल्याही फोटोग्राफी संघटनेचा सभासद नसुन बेकायदेशीर रित्या फोटोग्राफीचा व्यवसाय करीत आहे. व संबंधीत व्यवसायाबद्दल जाहिरातबाजी करुन गैरसमज पसरवित आहेत. व जनतेची दिशाभुल करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जाहीरातीत दिल्याप्रमाणे फोटोग्राफी व्हीडीओ चित्रीकरणाच्या दराविषयी दिशाभुल करण्याचे जाहीरात प्रत्यक्षात केलेली आहे.
सदर जाहिरातीबाबत फोटोग्राफर युनीयनचे सभासद अनंत ज्ञानेश्वर पाटील यांनी तसेच इतर सभासदांनी गैरअर्जदार बेकायदेशीर जाहिरात व बेकायदेशीर फोटोग्राफीबद्दल विचारणा केली असता गैरअर्जदार याने अनंत पाटील यास शिवीगाळ करून ‘युनीयन मेरा कुछ बिघाड नहीं सकती’ व मी कुठलीही युनीयन मानत नाही असे सांगुन माझ्या नांदी लागल्यास मी तुमच्याच विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करेल अशी धमकी देऊ लागला.सदर वसीम हा बेकायदेशीर रित्या फोटो ग्राफीचा व्यवसाय करीत असुन त्या अनुषंगाने बेकायदेशीर जाहीरात प्रसिद्ध करून कायदेशीर बाबीचा भंग करीत आहे. तरी त्याबाबत वसीम तेली व इतर तिघांवर योग्य ती कार्यवाही होण्यासाठी सदरची तक्रार अमळनेर पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांना दिली आहे. यावेळी फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष महेंद्र पाटील,सचिव दीपक बारी,विलास खैरनार,युवराज पाटील,गणेश पाटील,ज्ञानेश्वर देशमुख, राजेंद्र पाटील, किरण बडगुजर, फारूक खान,पंकज पाटील,किरण बागुल,सैय्यद मुख्तार अली, ऋषिकेश पाटील,चेतन महाजन,राजेंद्र पाटील, मकसूद अली, जयवंत ढवळे ,सागर चित्ते,शशिकांत पाटील, गणेश पाटील,पंकज भोई,मुरलीधर पाटील,प्रशांत पाटील,संतोष पाटील,चेतन महाजन,गौरव शुक्ल, धनश्याम पाटील,किशोर पाटील,महेश पाटील,आप्पा पाटील,धिरज चव्हाण,प्रेम पाटील,यांच्यासह सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.