मराठा आंदोलनामुळे जालना-पैठण मार्गावरील वाहतुकीत बदल
By तेजराव दांडगे

मराठा आंदोलनामुळे जालना-पैठण मार्गावरील वाहतुकीत बदल
जालना, दि. २६ ऑगस्ट: २७ ऑगस्ट २०२५ रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे निघणाऱ्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. आंदोलनात मोठ्या संख्येने लोक सहभागी होण्याची शक्यता असल्याने, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३६ नुसार हा बदल जाहीर केला आहे.
वाहतुकीचा पर्यायी मार्ग:
१) प्रचलित मार्ग: पैठण फाटा (शहागड) ते पैठण
२) पर्यायी मार्ग: बीड-गेवराईकडून येणारी आणि पैठण फाटा (शहागड) मार्गे पैठणकडे जाणारी वाहने आता शहागड – पाचोड (NH 52) या महामार्गाने एकेरी वाहतूक म्हणून ये-जा करतील.
हा वाहतूक बदल २७ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपासून आंदोलन संपेपर्यंत लागू राहील, असे पोलीस अधीक्षक कार्यालयाने कळवले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.