सामाजिक
अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाचे जेष्ठ नागरिक शिबिर उत्साहात संपन्न..
पुणे (शिरुर) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतीथी निमित्ताने न्हावरे (शिरूर) येथे महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकदिवसीय जेष्ठ नागरिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उदघाटन माजी प्राचार्य गोविंदराजे निंबाळकर यांच्या हस्ते झाले.
जेष्ठ नागरिक हा समाजाचा ठेवा असून आपल्या जवळ असलेले ज्ञान सर्वांना वाटायला हवं व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा जेणेकरुन आलेले नैराश्य दूर होऊन ते आनंदी जीवनाची वाटचाल करू शकतील तसेच या अनुभवाचा उपयोग नवीन पिढीनं करून घेतला पाहिजे असे मत माजी प्राचार्य गोविंदराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले.
या शिबिरात प्राचार्य पद्माकर पुंडे यांनी ‘सावधान सर्वदा’, पितांबर पाटील यांनी ‘साहित्यातील जीवनमूल्ये’ या विषयावर मार्गदर्शन केले. तर दिलीप गरुड यांनी झेल्या कथेचे सादरीकरण केले. बदलत्या जीवनमानानुसार ज्येष्ठ नागरिकांची परिस्थिती बदलत आहे. घराघरांत आंनदी वातावरण ठेवण्यासाठी सुसंवाद व्हायला पाहिजे. असे मत माजी प्राचार्य पद्माकर पुंडे यांनी व्यक्त केले.
साहित्यातून येणारी मूल्ये समाजासाठी महत्त्वाची असून जेष्ठांनी आपला वेळ श्रेष्ठ दर्जाचे साहित्य वाचले पाहिजे असे पितांबर पाटील यांनी सांगितले. दिलीप गरुड यांनी झेल्या कथेचे सादरीकरण करत जेष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध केले.
या प्रसंगी जेष्ठ नागरिक संघाचे रंगनाथ गायकवाड, केंद्र कार्यवाह डॉ. नाना झगडे, डॉ. सविता कुलकर्णी, उपसरपंच उत्तम कदम, ग्रामपंचायत सदस्य सुभाष कोकडे, संभाजी खंडागळे, माजी प्राचार्य भगवान मोरे, रंगनाथ गायकवाड, तुकाराम गिरमकर, भानुदास सात्रस, अमोल कांगुणे, शांताराम हांडे, शामकांत साठे, प्रा. गणपत आवटी, प्रा. अपूर्वा बनकर, प्रा. अर्चना श्रीचिप्पा, प्रा. विवेकानंद टाकळीकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. नाना झगडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विवेकानंद टाकळीकर यांनी केले तर आभार प्रा. प्रा. गणपत आवटी यांनी मानले.
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
“द पाॅईंट न्युज 24” – https://d9news.in/
फेसबुक – https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL
ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08
इन्स्टाग्राम – https://www.instagram.com
डेली हंट – https://profile.dailyhunt.in/sunil24
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
वाॅटसअप – https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj
वर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.