Jalna: रामनगरमधील फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स दुकान चोरी प्रकरणी आरोपीत जेरबंद, 7 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त
By तेजराव दांडगे

रामनगरमधील फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स दुकान चोरी प्रकरणी आरोपीत जेरबंद, 7 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त
जालना, दि. ११: रामनगर येथे एका व्यापाऱ्याच्या फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानातून चोरी झालेल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि मौजपुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका आरोपीताला अटक केली आहे. पोलिसांनी चोरी केलेला मुद्देमाल देखील जप्त केला आहे.
गुन्ह्याची पार्श्वभूमी: फिर्यादी ज्ञानेश्वर सर्जेराव मुळे (रा. भालगाव, ता. अंबड, जि. जालना, हल्ली मु. मार्कडेय नगर, जालना) यांनी मौजपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांनी सांगितले की, ०८/०४/२०२५ रोजी रात्री ९:०० वाजता त्यांचे माऊली फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्स नावाचे दुकान बंद करून ते घरी गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे मागील बाजूचे पत्र्याचे स्क्रू काढून पत्रे उचकटून आत प्रवेश केला आणि फर्निचर तसेच इलेक्ट्रॉनिक्सचे सामान चोरून नेले. याप्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसी कारवाई आणि आरोपीताची अटक:
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक, जालना आणि पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांनी आरोपींना पकडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ घटनास्थळी फिंगरप्रिंट आणि डॉग युनिटला पाचारण करण्यात आले. फिर्यादी यांच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे श्री. राजेंद्र वाघ यांच्या पथकाने दिलीप दगडुबा झिने (रा. लोणगाव, ता. भोकरदन, जि. जालना) याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता, दिलीप झिने याने विनोद काळे आणि बळीराम फुके (दोघे रा. लोणगाव, ता. भोकरदन, जि. जालना) यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीताकडून चोरी केलेला एल.ई.डी. टीव्ही (३२ इंच), सुर्या कंपनीच्या गॅस शेगड्या, मिक्सर आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप असा एकूण ७ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे.
आरोपीताने उर्वरित मुद्देमाल त्याच्या फरार साथीदारांकडे असल्याचे सांगितले आहे. पोलीस सध्या फरार आरोपीतांचा शोध घेत असून, उर्वरित मुद्देमाल जप्त करण्याची आणि आरोपीतांना अटक करण्याची कार्यवाही सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास मौजपुरी पोलीस करत आहेत.
पोलिस पथक: ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी दादाहरी चौरे आणि पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी पो.स्टे मौजपुरी मिथुन घुगे, सपोनि योगेश उबाळे (स्थागुशा, जालना), सपोनि डिगांबर कठाळे (फिंगर प्रिन्ट शाखा, जालना), पोउपनि राजेंद्र वाघ, प्रभाकर वाघ, लक्ष्मीकांत आडेप, ईशाद पटेल, कैलास खार्डे, रमेश काळे, सागर बावीस्कर (स्थागुशा, जालना), गणेश वाघ, राजेंद्र राव, रवि खलसे (फिंगर प्रिन्ट शाखा, जालना) आणि ज्ञानोबा बिरादार, संजय राऊत, दादासाहेब हरणे, प्रदिप पाचरणे, अविनाश मांटे (पो.स्टे मौजपुरी) यांनी केली आहे.