अमळनेरात राष्ट्रसंत गाडगेबाबा स्मारक भुमिपुजन सोहळा संपन्न..
अमळनेर(प्रतिनिधी) महाराष्ट्रातील संत मालिकेतील एक संत म्हणजे संत गाडगेबाबा होय घरदार स्वच्छ असेल तर मन स्वच्छ राहते हा आईचा शब्द डेबुजींनी आयुष्यभर सांभाळला. ज्या गावात किर्तन करायचे असे ते गांव संपुर्ण झाडुन स्वच्छ करित व रात्री किर्तनाच्या माध्यमातुन लोकांच्या डोक्यातील वाईट विचारांची घाण साफ करित असे प्रतिपादन माजी आमदार कृषिभूषण दादासो साहेबराव पाटील यांनी पाचपावली मंदिराजवळ,संत गाडगेबाबा चौक, धुळे रोड येथे उभारण्यात येणार्या राष्ट्रसंत गाडगेबाबा स्मारकाच्या भुमिपुजना प्रसंगी केले. काल २० रोजी सायं. ५ वा. झालेल्या या कार्यक्रमास लोकनियुक्त नगराध्यक्षा ताईसो पुष्पलता साहेबराव पाटील याच्या शुभहस्ते स्मारकाचे भुमिपुजन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर साहेब,उपनगराध्यक्ष विनोद लाबोळे नानासो विक्रांत पाटील,अँड वाय.पी.पाटील,शांताराम ठाकुर,शेखा मिस्तरी,धोबी समाजाचे अध्यक्ष अमुत जाधव, किशोर महाले, गुलाबराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक सुत्रसंचलन दिपक वाल्हे,व आभार प्रदर्शन जगतराव निकुंभ यांनी केले.
यावेळी कार्यक्रमास रविंद्र जाधव, गोरख चित्ते, मोतीलाल जाधव,विजय वाघसर, सतिष पवार, अनिल वाघ, अनिल मांडोळे, मधुकर निंबाळकर, विनोद जाधव सर, गंगाराम वाल्हे, अनिल वाहे, प्रकाश पवार, मनोज चित्ते,योगेश जाधव,काशिनाथ खैरनार, रमेश जाधव,भरत जावदेकर, भास्कर वाल्हे, नरहरी बोरसे, गणेश नेरकर आदी समाज बांधव उपस्थित होते