सुनिल थोरात (प्रतिनिधी)
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात सत्ता स्थापन झाली आहे. निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्याने पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार सत्तेत आलं आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचा या निवडणुकीत जवळपास सुपडासाफ झाला.
महाविकास आघाडीची आकडेवारी पाहिली तर मविआला ४८ जागांचा देखील आकडा गाठण्यात यश आलेलं नाही. याउलट महायुतीच्या यशाची गाडी ही २३० जागांपर्यंत गेली आहे. त्यामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. विरोधकांकडून या निकालावरुन विविध प्रकारचे आरोप केले जात आहे. विरोधकांकडून महायुती सरकारवर ईव्हीएममध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला जातोय. विरोधकांकडून ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणीचा जोर धरू लागली आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून याच मागणीसाठी आग्रह केला जात आहे. महाविकास आघाडीचा सुपडासाफ तरीही वंचित मागणीसाठी आघाडीवर आहे. विशेष म्हणजे वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी थेट राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवलं आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (६ डिसेंबर) राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम यांना पत्र लिहिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील तात्पुरत्या मतदारांच्या मतदानातील तफावत आणि अंतिम आकडेवारीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यासाठी आंबेडकरांनी हे पत्र लिहिले आहे.

या पत्रात प्रकाश आंबेडकर यांनी तीन प्रश्न विचारले आहेत. मतदाराला त्याचे/तिचे/त्यांचे मत देण्यासाठी लागणारा वेळ किती? जिल्हा निवडणूक अधिकारी/रिटर्निंग अधिकारी आणि पर्यवेक्षक यांनी २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते संध्याकाळी ६ या वेळेत झालेल्या मतांची नोंद केली आहे का? आणि असल्यास, त्याचा तपशील काय?; जिल्हा निवडणूक अधिकारी/रिटर्निंग ऑफिसर यांनी २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:५९ वाजता रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना जारी केलेल्या टोकनची संख्या नोंदवली आहे का आणि असल्यास, त्याचा तपशील काय? असे तीन प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उस्थित केले आहेत.

आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणे आणि आमच्या चिंतेचे निराकरण करणे महत्त्वाचे आहे. कारण ते भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रिया आणि आचरणावरील घसरलेल्या आणि डळमळलेल्या विश्वासाची दखल घेतील, असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला. निवडणूक आयोग यावर काय उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीने आक्रमकपणे EVM मशीनमधील घोळ बाहेर काढले आहेत आणि जनजागृतीसाठी EVM हटाव स्वाक्षरी मोहीम राबवत आहे.
सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??