अमळनेरच्या रस्त्यांवर कुत्र्यांचे राज्य; भटक्या कुत्र्यांने चिमुरड्यांचे तोडले लचके….
अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील मौजे धुपी खेड्यागावात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात दोन शाळकरी चिमुरडी गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी धुपी येथे घडली. याबाबत असे की,सौरभ प्रमोद पाटील वय ८,जयेश रवींद्र पाटील वय अडीच वर्ष हे गावातील आपल्या घरा बाहेर आज दुपारी खेळत असतांना गावातील भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला करत त्यांना जखमी केले.
यात सौरभच्या उजव्या डोळ्यावर चावा घेतला तर जयेशच्या कपाळावर चावा घेतला आहे. तात्काळ त्यांना उपचारासाठी अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्यांनी प्रथमोपचार करत दोन्हीही रुग्णांना अधिक उपचारासाठी धुळे येथील सरकारी रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.
भटक्या कुत्र्यांची दहशत…..दरम्यान कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अमळनेरच्या रस्त्यांवर कुत्र्यांचे राज्य असतं! कुत्र्यांच्या टोळ्या एकट्या दुकट्या माणसाचा, बाईकस्वाराचा लांब अंतरापर्यंत जीवघेणा पाठलाग करतात. श्वानदंश किती होतात, याचे कुठेही अधिकृत रेकॉर्ड नाही कुत्र्यांच्या भयाण भुकण्यामुळे किती जणांना निद्रानाश जडलय याची गणती नाही. अमळनेर आणि
लगतच्या खेड्यामध्ये कित्येक गल्ल्या कुत्र्यांच्या हल्ल्यासाठी ओळखल्या जातात, हे विदारक सत्य आहे. यादृष्टीने अमळनेर नगरपरिषदेने व ग्रामपंचायती ने लक्ष देऊन मोकाट कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी जनमानसात होत आहेे.संतप्त जमावाने त्या कुत्र्याचा खातमा केला.