शिक्षक रवींद्र लोखंडे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर
By तेजराव दांडगे
शिक्षक रवींद्र लोखंडे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर
पारध( प्रतिनिधी): भोकरदन तालुक्यातील पारध येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक तथा पत्रकार रवींद्र लोखंडे यांना पुणे येथील इतिहास अकादमी, राष्ट्रसेवा समूह, रयत प्रकाशन व गिरीप्रेमी ग्रुप यांच्यावतीने आपल्या देशात सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया घालणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रति असणाऱ्या कृत्याज्ञ भावनेने त्यांच्या नावे राज्यस्तरीय महात्मा फुले व सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून सदरील पुरस्कार युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते तथा माजी आ. दत्तात्रय सावंत, पुणे विभागाचे शिक्षण निरीक्षक रावसाहेब मिरगणे, आय. आर. एस. विपुल वाघमारे, प्रसिद्ध शिवचरित्रकार डॉ. श्रीमंत कोकाटे, श्रीराम शिक्षण संस्थेच्या श्रीलेखा पाटील, शिक्षकेतर संघटनेचे सचिव शिवाजी खांडेकर, जयहिंद साखर कारखान्याचे चेअरमन गणेश माने देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत २३ जानेवारी २०२५ रोजी पुणे येथील एस एम जोशी सभागृहात प्रदान करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी एका पत्राद्वारे कळविले आहे.
लोखंडे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, आ.संतोष दानवे, माजी सभापती परमेश्वर लोखंडे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख (उद्धव ठाकरे गट) मनीष श्रीवास्तव,संस्थेचे सचिव उदयसिंह लोखंडे, उपाध्यक्ष सुनील वानखेडे, प्राचार्या शर्मिला शिंदे लोखंडे, पर्यवेक्षक, महेंद्र लोखंडे, प्रा.संग्रामराजे देशमुख, पत्रकार बांधव यांच्यासह शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले.