आपला जिल्हाजालना जिल्हाताज्या घडामोडी
आमदार अर्जुनराव खोतकर आणि युवासेना सचिव अभिमन्यु खोतकर यांना जीवे मारण्याची धमकी; शिवसेनेकडून तीव्र निषेध!
घटनेचा शिवसेनेने तीव्र निषेध, दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी

आमदार अर्जुनराव खोतकर आणि युवासेना सचिव अभिमन्यु खोतकर यांना जीवे मारण्याची धमकी; शिवसेनेकडून तीव्र निषेध!
पारध, दि. 26: शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर आणि युवासेना सचिव अभिमन्यु खोतकर यांना अज्ञात व्यक्तींकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेचा शिवसेनेने तीव्र निषेध केला असून, दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी पारध बु. पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शिवसेना भोकरदन तालुका शाखेच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, आमदार अर्जुनराव खोतकर आणि युवासेना सचिव अभिमन्यु खोतकर यांना जीवे मारण्याची धमकी गंभीर असून, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप असून, दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर अक्षय (बबलू) तेलंग्रे, युवराज (चेतन) देशमुख, अमोल श्रीवास्तव, सागर श्रीवास्तव यांच्या सह्या आहेत.