दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या दणदणीत विजयाचा भाजपा जिल्हा जालना च्या वतीने फटाके फोडून विजयी जल्लोष !
By तेजराव दांडगे
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या दणदणीत विजयाचा भाजपा जिल्हा जालना च्या वतीने फटाके फोडून विजयी जल्लोष !
जालना (प्रतिनिधी) : – दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशामुळे जालना शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. यामध्ये जालना शहरातील भाजपा जिल्हा कार्यालय, वीर सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा मस्तगड, गांधी चमन या ठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटक्याची आतिशबाजी करून पेढे वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे व जालना महानगर जिल्हाध्यक्ष सतिष जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.पठाडे म्हणाले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक महाविजय मिळाला आहे. त्यामुळे 27 वर्षानंतर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे. दिल्लीतील या विजयाचा जालना येथे माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला व फटाके फोडून आतषबाजी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दिल्लीकर जनतेने भाजपला दिलेला हा ऐतिहासिक विजय आहे असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष श्री.पठाडे यांनी केले आहे.
यावेळी जालना महानगर जिल्हाध्यक्ष सतिष जाधव म्हणाले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजप ला स्पष्ट बहुमतासह मोठा विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर दिल्लीकरांनी व्यक्त केलेल्या विश्वासाचे प्रतिक आहेत. आता दिल्लीच्या सर्वांगीण विकासाला दुप्पट गती मिळेल. चांगले रस्ते, स्वच्छ पाणी, उत्तम शिक्षण, दर्जेदार आरोग्य सुविधांचं, देशाच्या राजधानीचं सर्वांगसुंदर शहर हे दिल्लीकरांचं स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जसी दिल्ली जिंकली तसेच जालना महानगरपालिका सुद्धा माजी मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली जिंकू व भाजपाचा झेंडा आम्ही फडकवू असे ही ते म्हणाले.
यावेळी प्रदेश निमंत्री सदस्य विजय कामड, जिल्हा सरचिटणीस सिध्दीविनायक मुळे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.संध्याताई देठे, महिला मोर्चा महानगराध्यक्षा सौ.शुंभागीताई देशपांडे, सौ.अरुणा जाधव, बबनराव सिरसाठ, विष्णु डोंगरे, राजेश जोशी, भाजपा तालुकाध्यक्ष वसंतराव शिंदे, नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे, महेश निकम, प्रा.राजेंद्र भोसले, प्रमोद गंडाळ, सोमनाथ गायकवाड, सुंदर्शन काळे, उमेश अग्रवाल, दिनेश व्यास, बद्रीनाथ भसांडे, गणेश खरात, शंकर काळे, ओम कळकुंबे, उमेश पेंढारकर, गौरव गोधेकर, रामलाल जाधव, रोहित नलावडे, अमन मित्तल, शाम जाधव, उद्धव ढवळे, प्रतिक पोहेकर, अनिल यशवंते, योगेश सामलेटी, सिद्धार्थ संचेती, राहुल परदेशी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते या विजय उत्सवात सहभागी झाले होते.