
पिंपळगाव रेणुकाई येथे बहुजन समाजाची चिंतन सभा संपन्न
पिंपळगाव रेणुकाई/ प्रतिनिधी: भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे रविवार, दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी बहुजन समाजाची चिंतन बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थान प्रकाश बोर्डे यांनी भूषविले.
बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ आणि ओबीसी समाजचिंतक अॅड. सिरसाठ तसेच बहुजनवादी विचारवंत शामराव दांडगे हे उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना सिरसाठ यांनी “बहुजन समाजाची दशा आणि दिशा” या विषयावर सखोल असे विचार मांडले. पुढे बोलताना ते म्हणाले की, बहुजन समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि अल्पसंख्यांक घटकांनी गावा गावामध्ये जातीय तेढ निर्माण करून भांडणे केल्यापेक्षा संविधानाची कास धरुन शिक्षणाच्या माध्यमातून आपली सामाजिक आणि आर्थिक उन्नती कशी करता येईल याकडे उपस्थितांचे लक्ष
वेधले घटकांचा संपूर्ण विकास झाल्याशिवाय आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय देशात सुदृढ व निकोप लोकशाही निर्माण होऊ शकत नाही असेही ते म्हणाले
याप्रसंगी बहुजनवादी विचारवंत शामराव दांडगे यांनीही बहुजन ऐक्य व सामाजिक परिवर्तनावर प्रेरणादायी विचार मांडले.
कार्यक्रमाला राहुल बोर्डे, समाधान बोर्डे, राजू बोर्डे, दिनेश बोर्डे, संतोष बोर्डे, सतीश बोर्डे, मुरलीधर बोर्डे, गजानन बोर्डे, गणेश बोर्डे, सुमित बोर्डे, कुणाल बोर्डे, अक्षय बोर्डे, गौतम बोर्डे, आदित्य जगताप, पांडुरंग बोर्डे, संदीप बोर्डे, सुभाष बोर्डे, शैलेश बोर्डे, प्रकाश लोखंडे, बबन बोर्डे, किशोर बोर्डे, अमोल बोर्डे, त्रिशरण बोर्डे, नाना बोर्डे, एस. के. बोर्डे आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश लोखंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अॅडवोकेट इरफान पटेल यांनी मानले.



