जालना जिल्ह्याच्या नव्या जिल्हाधिकारी म्हणून आशिमा मित्तल यांनी पदभार स्वीकारला
By गौतम वाघ

जालना जिल्ह्याच्या नव्या जिल्हाधिकारी म्हणून आशिमा मित्तल यांनी पदभार स्वीकारला
जालना, दि. ०१: जालना जिल्ह्याच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी १ ऑगस्ट २०२५ रोजी आपला पदभार स्वीकारला. यापूर्वी त्या नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. नाशिकमध्ये त्यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केले आहे.
मूळच्या राजस्थान राज्यातील जयपूर येथील रहिवासी असलेल्या आशिमा मित्तल यांनी आयआयटी मुंबई येथून बी.टेक. सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे, ज्यात त्यांना शंकर दयाल शर्मा सुवर्णपदक मिळाले होते. त्यांनी मानववंशशास्त्र या विषयातही पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
२०१७ साली भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या देशभरात १२ व्या क्रमांकावर आल्या होत्या. २०१८ मध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्यात सेवा सुरू केली. याआधी त्यांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आयटीडीपीच्या प्रकल्प अधिकारी म्हणून आणि अहमदनगर येथे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले आहे.