आपला जिल्हाजालना जिल्हामहत्वाचे
गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल वाटप योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्याचे आवाहन
By गौतम वाघ

गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल वाटप योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्याचे आवाहन
जालना, दि.२८ : जिल्ह्यातील गटई कामगारांना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे आणि त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी १०० टक्के अनुदानावर पत्र्याचे स्टॉल पुरविण्याची योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याकडून सन २०२५-२६ या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी त्यांचे अर्ज सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना या कार्यालयात दिनांक १५ जून २०२५ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन अनंत कदम, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.